कोरोना योद्धा, फ्रंटलाइन वर्कर्स, नागरिकांना टोचले एक लाखावर लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:04 AM2021-03-19T04:04:17+5:302021-03-19T04:04:17+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना ...
औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना योद्धा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ आणि व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना एक लाखावर लस टोचण्यात आले आहेत. यात ८६ हजार २१९ पहिल्या डोसचा आणि १४ हजार दुसऱ्या डोसचा समावेश आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील, विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तर दुसरीकडे लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लागत असल्याची परिस्थिती आहे.
------
जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती
एकूण दिलेले लसीचे डोस-१ लाख २१९
पहिला डोस -८६ हजार २१९
दुसरा डोस- १४ हजार
------
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस-२७ हजार ६५७
दुसरा डोस-१२ हजार २९७
----
फ्रंटलाइन वर्कर्स
पहिला डोस-१७ हजार ८२९
दुसरा डोस-१ हजार ७०३
----
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस-३० हजार ८४८
-----
व्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक
पहिला डोस-९ हजार ८८५