कोरोना वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:02 AM2021-03-20T04:02:01+5:302021-03-20T04:02:01+5:30
आपल्या आरोग्याप्रति वाढली जागरूकता कोरोनामुळे आरोग्याविषयी गांभीर्याने विचार करणे व स्वतःसाठी वेळ देणे सुरू केले हा मोठा बदल झाला. ...
आपल्या आरोग्याप्रति वाढली जागरूकता
कोरोनामुळे आरोग्याविषयी गांभीर्याने विचार करणे व स्वतःसाठी वेळ देणे सुरू केले हा मोठा बदल झाला. लॉकडाऊन काळात बँका सुरू होत्या. कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये जीवमुठीत ठेवून काम करावे लागले. खबरदारी घेऊनही मागील वर्षभरात शहरतील सार्वजनिक बँकांमधील ३० टक्के कर्मचारी कोरोना बाधित झाले. त्यात ९० टक्के कॅशिअर होते. बँक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश आहेत. पण ते शक्य नसल्याचे बँक व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन असो वा नसो बँकेत कामावर यावेच लागते. ऑनलाइन बँकिंग, एटीएमचा वापर सुरू आहे, पण त्यास ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. अवघे १५ टक्के खातेदार एटीएमचा वापर करतात. त्यातही एटीएमचा जास्त वापर करणारे १० टक्के युवक आहेत. बँकांनी लावलेले चार्जेस व ऑनलाइनमध्ये होणारी फसवणूक यामुळे ५० टक्के खातेदार बँकेत येऊन व्यवहार करत आहेत. यामुळे बँकामधील गर्दी कमी होताना दिसत नाही. ही होणारी गर्दी बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. यावर विचार होणे अपेक्षित आहे.
हेमंत जामखेडकर
कॅशियर, सेंट्रल बँक