कोरोना वर्षपूर्ती..... जगभरात ऑनलाईन सुविधा सर्वमान्य झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:06 AM2021-03-21T04:06:17+5:302021-03-21T04:06:17+5:30
(कोरोना वर्षपूर्ती........ याखाली योगेश पायघनचे शालेय शिक्षणासंबंधीचे वृत्त घ्यावे) औरंगाबाद : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. सर्वच क्षेत्रांवर त्याचा ...
(कोरोना वर्षपूर्ती........ याखाली योगेश पायघनचे शालेय शिक्षणासंबंधीचे वृत्त घ्यावे)
औरंगाबाद : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. सर्वच क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. अजूनही त्यातून सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. यापुढे त्यातून कधी सुटका होईल, हेही आता ठामपणे सांगता येत नाही. यामुळे जेवढे नुकसान होत आहे, तुलनेने यातून काही चांगल्या बाबीही आत्मसात करता आल्या. प्रामुख्याने शिक्षणासाठी नवनवीन प्रयोग यशस्वी ठरले. यापुढे भावी पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल.
एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी सांगितले की, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य उच्च शिक्षणावर कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला म्हणून शिक्षण थांबले नाही. ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन प्रात्यक्षिके, ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन प्रशिक्षण, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजनाची प्रथा सुरू झाली. अगोदरही ऑनलाईनची सुविधा होती; पण मोजक्याच घटनेसाठी तिचा उपयोग केला जायचा. आता ही सुविधा सर्वमान्य झाली आहे.
कोरोना महामारीमुळे ऑनलाईनला जास्त महत्त्व आले. वर्गात शिकवले जाते; तसेच ऑनलाईन वर्ग घेण्यात येतात. प्रात्यक्षिकेही ऑनलाईन घेतली जातात. मुले समोर ठेवून त्यांच्यासोबत संवाद साधत शिक्षक प्रयोगशाळेत ऑनलाईन प्रात्यक्षिक करून दाखवतात. कोणी त्याचे शूटिंग करून त्याची व्हिडिओ क्लिप विद्यार्थ्यांना पाठवतात. एवढेच नव्हे तर विविध देशांतील जागतिक कीर्तीचे विषयतज्ज्ञ मुलांना ऑनलाईन मार्गदर्शन करतात. परिसंवाद, चर्चासत्रांत सहभागी होतात. यासाठी अगोदर त्यांना निमंत्रित करून महाविद्यालयामध्ये आणले जायचे. येण्यासाठी अनेकदा त्यांच्याकडे वेळ नसायचा. आता ते जिथे आहेत, तेथूनच मार्गदर्शन करतात. यामुळे मोठा खर्च व त्यांचा येण्या-जाण्याचा वेळदेखील वाचत आहे.