कोरोनामुळे मृत मुख्याध्यापकाच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:05 AM2021-05-06T04:05:07+5:302021-05-06T04:05:07+5:30
माणुसकीचे दर्शन : शिक्षकांनी केली सढळ हाताने मदत --- औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील जोड बोरसर येथील विद्यानिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक ...
माणुसकीचे दर्शन : शिक्षकांनी केली सढळ हाताने मदत
---
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील जोड बोरसर येथील विद्यानिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक त्र्यंबक पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. आता कुठे त्यांची शाळा ४० टक्के अनुदानावर आली होती. शाळा विनाअनुदानित असल्यामुळे त्यांना पेन्शन, भविष्य निर्वाह निधी लाभ शासनाकडून दिले जात नसल्याने, आर्थिक संकटातील या कुटुंबीयांना शिक्षकांनी जमा करून ३ लाख ८० हजारांची मदत सुपुर्द करत माणुसकीचे दर्शन घडविले.
आपल्यातला सहकारी कोरोनामुळे गेला. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.बी.बी. चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे आवाहन शिक्षकांना केले. जिल्ह्यातील शिक्षकांनी चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आपापल्या परीने शिक्षण विभागातील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी ३ लाख ८० हजार रुपये शिक्षक मदन गोरे यांच्या खात्यावर जमा केली. ही मदत मृत मुख्याध्यापकांचा मुलाकडे शिक्षणाधिकारी डॉ.बी.बी. चव्हाण यांच्यासह उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, अधीक्षक पालवे, मदन गोरे, शिवराम म्हस्के आदींनी चेक स्वरूपात सुपुर्द केली. त्यामुळे कुटुंबीयांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाचे आभार मानले.