कोरोनाची धास्ती; एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 07:40 PM2021-03-30T19:40:07+5:302021-03-30T19:41:39+5:30

औरंगाबाद-पुणे मार्गावरील व्हाल्वो बसद्वारे सुरू केलेल्या शिवनेरी बससेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे एसटी महामंडळासाठी हा ‌गोल्डन रूट म्हटला जातो.

Corona's fear; Tourist say no to AC, packed Shivneri buses | कोरोनाची धास्ती; एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको रे बाबा !

कोरोनाची धास्ती; एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको रे बाबा !

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांनी भरून धावणाऱ्या शिवनेरी बस सध्या रिकाम्याच धावताना पहायला मिळत आहे.प्रवासी संख्या कमी झाल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही घट झाली आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : प्रतिष्ठित, आरामदायी आणि वातानुकूलित अशी शिवनेरी बसची ओळख. औरंगाबाद-पुणे मार्गावरील शिवनेरी बसच्या तिकिटासाठी अक्षरश: दिवसेंदिवस वेटिंग करावी लागत असे. परंतु कोरोनाच्या भीतीने एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको, असे म्हणत प्रवासी दूर जात आहे. परिणामी, शिवनेरी बसची सेवा नावालाच उरली आहे.

औरंगाबाद-पुणे मार्गावरील व्हाल्वो बसद्वारे सुरू केलेल्या शिवनेरी बससेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे एसटी महामंडळासाठी हा ‌गोल्डन रूट म्हटला जातो. नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दर शनिवारी, रविवारी आणि सुटीच्या दिवशी या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असे. यात तिकीट दर अधिक असूनही शिवनेरीने प्रवास करण्यास प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. परंतु कोरोनामुळे सध्या परिस्थिती बदलली आहे. पुणे मार्गावरील प्रवासी संख्या कमी झाली आहे. पुण्याला ये-जा करणारे प्रवासी आता खासगी वाहनांनी, शेअररिंग वाहनांनी ये-जा करण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे शिवनेरी बसच्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

रिकाम्याच धावण्याची वेळ
प्रवाशांनी भरून धावणाऱ्या शिवनेरी बस सध्या रिकाम्याच धावताना पहायला मिळत आहे. प्रवाशांच्या प्रतीक्षेत तासन‌्तास बस उभ्या असतात. ४५ आसन क्षमता असलेल्या या बसमध्ये सध्या ५ ते १० प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. एवढ्या प्रवाशांद्वारे वाहतूक करताना इंधन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.

उत्पन्नात झाली घट
प्रवासी संख्या कमी झाल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही घट झाली आहे. पुणे मार्ग हा ‘एसटी’ला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग ठरत होता. परंतु आजघडीला ५० टक्क्यांखाली भारमान म्हणजे प्रवासी संख्या आली आहे. त्यामुळे उत्पन्नातही जवळपास ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद कमी 
औरंगाबाद विभागात सध्या तीन शिवनेरी बसेस आहेत. यात दोन वेरूळ, अजिंठ्याच्या बसेसचा समावेेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. औरंगाबादला येणाऱ्या पुण्याच्या शिवनेरी बसची संख्याही कमी झाली आहे.
- अमोल अहिरे, विभागीय वाहतूक अधिकारी

वेरूळ, अजिंठ्याच्या बस पुण्याला
औरंगाबाद विभागाच्या पुणे मार्गावरील दोन शिवनेरी बस काही महिन्यांपूर्वी ठाण्याला ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या पुण्यासाठी एकच शिवनेरी बस उरली आहे. वेरूळ आणि अजिंठा लेणीसाठी दोन शिवनेरी बस देण्यात आलेल्या आहेत. सध्या दोन दोन्ही बसही पुणे मार्गावर चालविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शिवनेरी बसची संख्या-३
सध्या सुरू असलेल्या शिवनेरी-३
------------------------- -----

Web Title: Corona's fear; Tourist say no to AC, packed Shivneri buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.