कोरोनाच्या धास्तीने कुलुपबंद कोविड केअर सेंटर पुन्हा उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:56+5:302021-02-25T04:05:56+5:30
फुलंब्री : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कुलुपबंद केलेले फुलंब्री तालुक्यातील कोरोना सेंटर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने पुन्हा उघडण्यात आले ...
फुलंब्री : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कुलुपबंद केलेले फुलंब्री तालुक्यातील कोरोना सेंटर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने पुन्हा उघडण्यात आले आहेत. तालुक्यात कोरोनाला पायबंद घालण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून जोरदार तयारी केली आहे.
फुलंब्री तालुक्यात गेल्या नऊ महिन्यांच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या ५४२ वर गेली होती. आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे; तर ५१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या घडीला केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. संसर्ग सुरू झाल्यानंतर पहिला रुग्ण फुलंब्री शहरात मे २०२० मध्ये सापडला होता. यानंतर हे कोरोनाचे लोण ग्रामीण भागात पोहोचले. आतापर्यंत फुलंब्री शहरासह ग्रामीण भागातील ५२ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत.
पॉईंटर
फुलंब्री तालुक्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या - ५४२
कोरोनामुक्त रुग्णसंख्या - ५१५
कोरोनामुळे मृत्यू- २५
सध्या उपचार सुरू - ०४
कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण - ९६.८६ टक्के
एकूण कोविड केअर सेंटरची संख्या - ०१
कोट
राज्यात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करा, लहान मुले व वयोवृद्धांची अधिक काळजी घ्यावी, तर आपण कोरोनाला थोपविण्यात यशस्वी होऊ.
- डॉ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्याधिकारी, फुलंब्री.
चौकट
तालुक्यात मे २०२० मध्ये दोन कोरोना संक्रमित रुग्ण सापडले होते. यानंतर कोरोनाचे रुग्ण निघण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट २०२० मध्ये सर्वाधिक १५६ रुग्ण सापडले होते. सध्या फेब्रुवारी २०२१ मध्ये ५ रुग्ण सापडले आहेत.
चौकट
कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने बिल्डा येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. पण आता दुसरी लाट येण्याची शक्यताअसल्याने हे सेंटर बुधवारी उघडण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे.
फोटो कॅप्शन : फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील कोविड सेंटर बुधवारी उघडण्यात आले.
240221\rauf usman shaik_img-20210224-wa0013_1.jpg
फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील कोवीड सेंटर बुधवारी उघडण्यात आले.