CoronaViruals : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह; एकाच दिवसात तीन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 01:04 PM2020-04-16T13:04:52+5:302020-04-16T13:47:50+5:30

१७ वर्षीय कोरोना बाधित मुलाची गरोदर आईसुद्धा पॉझिटिव्ह

CoronaViruals: Worrying! Corona-positive 65-year-old woman in Aurangabad; Three patients in a single day | CoronaViruals : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह; एकाच दिवसात तीन रुग्णांची भर

CoronaViruals : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह; एकाच दिवसात तीन रुग्णांची भर

googlenewsNext

औरंगाबाद : घाटीत ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच गुरुवारी शहरात तिसऱ्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या २८ वर गेली आहे.


कोरोना बाधित असलेली महिला बिस्मिला कॉलनी येथील रहिवाशी आहे. खाजगी रुग्णालयातून महिला रेफर झाली होती. 13 एप्रिल पासून ती मेडिसीन विभागात भरती आहे. महिकेचा त्याच दिवशी स्वॅब घेण्यात आला होता. तो अहवाल आज  पॉझिटिव्ह आला आहे अशी मााहिती जिल्हा शल्यचिकित्सक एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलाची गरोदर आईही पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर किराडपुरा येथे आणखी एक २२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १० एप्रिल रोजी हा मुलगा आई-वडिलांसह शहरात आला. यानंतर बुधवारी मुलाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला.  या १७ वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आईचाही स्वब घेण्यात आलेला होता. हा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले होते. अखेर हा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तर किराडपुरा येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

Web Title: CoronaViruals: Worrying! Corona-positive 65-year-old woman in Aurangabad; Three patients in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.