CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी १७ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 08:40 AM2020-05-09T08:40:55+5:302020-05-09T08:41:38+5:30

शुक्रवारी दिवसभरात १०० पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ

CoronaVirus: 17 more positive in Aurangabad; total Number of patients 495 | CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी १७ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४९५

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी १७ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४९५

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात एसआरपीएफच्या ७४ रुग्णांना बाधा

औरंगाबाद : शुक्रवारी दिवसभरात १०० पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी १७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात कोरोना बाधितांचा आकडा ४९५ झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली

शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये संजयनगर 6, कटकट गेट 2, बाबर कॉलनी 4, भवानी नगर 2, राम नगर, सिल्क मिल आणि असिफिया कॉलनी येथील प्रत्येक एकाचा समावेश आहे. यात 10 महिला 7 पुरुष बाधित झाल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

शुक्रवारी विक्रमी १०० रुग्ण पॉझिटिव्ह
शहरात शुक्रवारी सकाळी दोन तासात ९० ने वाढ झाल्यावर सायंकाळी पुन्हा नऊ रुग्णांची भर पडली. यात एसआरपीएफचा एक जवान, संजयनगर मुकुंदवाडी येथील ८ रुग्ण आहेत तर रात्री उशिरा रोशन गेट येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील २७ व सीआरपीएफचे ७३ असे विक्रमी १०० रुग्ण एकाच दिवसात वाढल्याने शहराचा कोरोना बाधितांचा आकडा ४७८ झाला 

शहरात एसआरपीएफचे ७४ जवान बाधित
मालेगाव येथे दीड महिना लॉकडाऊनचा बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील ११० जवानांची ५ मे रोजी परतल्यानंतर जवानांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले. ६ मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी ७२ जवानांना कोरोनाची लागण झाली. राज्य राखीव दलाच्या एका जवानाला २८ एप्रिलला कोरोनाची बाधा झाली होती.  तर शुक्रवारी सकाळी ७२ तर सायंकाळी एक असे एकुण ७४ जवान कोरोना बाधित झाले आहेत.

Web Title: CoronaVirus: 17 more positive in Aurangabad; total Number of patients 495

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.