coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १४ दिवसांतच ५० वर्षांखालील २० मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 07:40 PM2020-06-27T19:40:19+5:302020-06-27T19:40:23+5:30
मे आणि जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत २१ ते ५० या वयोगटातील तब्बल २० जणांचा बळी गेला. ५ एप्रिल ते १० जून या कालावधीत या वयोगटात केवळ २४ जणांचा मृत्यू झाला होता; परंतु केवळ १४ दिवसांत हे प्रमाण वाढले. औरंगाबाद शहरात ५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ७ होती; परंतु मे आणि जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाºयांमध्ये ५१ ते ८० या वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळाले, तर २१ ते ५० वयोगटात मृत्यूचे प्रमाण कमी होते. १० जूनपर्यंत म्हणजे अडीच महिन्यांत २१ ते ५० वयोगटातील २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे या वयोगटातील रुग्णांना फारसा धोका नसल्याचे सांगितले जात होते; परंतु याच वयोगटात २४ जूनपर्यंत एकूण ४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे १४ दिवसांत या वयोगटात २० बळी वाढले आहेत.
मृत्यूचा धोका आला विशीपर्यंत
एका विशीतील तरुणीचा बुधवारी कोरोनाने बळी गेला. मृतांमधील आतापर्यंतचा हा सर्वात कमी वयाचा रुग्ण ठरला आहे. त्यामुळे मृत्यूचा धोका विशीपर्यंत आल्याची चिंता व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत असे वाढले प्रमाण