coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी २२ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या १३२७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:23 AM2020-05-26T09:23:37+5:302020-05-26T09:24:01+5:30
मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे
औरंगाबाद : शहरातील २२ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या १३२७ झाली.
मंगळवारी जुना मोंढा- १, बायजीपुरा- १, रोहिदासपुरा-१, कांचनवाडी-१, भारतमातानगर (हडको)-१, नवीनवस्ती (जुनाबाजार )- ४, जुना हनुमाननगर-१, हनुमान चौक-१, न्यायनगर-१, कैलाशनगर-१, रामनगर-१, एन ८ (सिडको )-४, रोशन गेट-१, एन ११ (सुभाषचंद्र नगर)- १, पुंडलीक नगर-१, भवानीनगर -१, या भागात कोरानाबाधित आढळले आहेत. यामध्ये ११ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.