coronavirus : औरंगाबादेत २८ बाधितांची वाढ; १४८७ वर पोहचली रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 08:59 AM2020-05-30T08:59:00+5:302020-05-30T08:59:20+5:30
४६३ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (दि.३०) सकाळी २८ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या १४८७ झाली आहे. यापैकी ९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ६९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
या भागात आढळले बाधीत
जुना बाजार २, मुझफ्फर नगर, हडको १, व्यंकटेश नगर १, सुराणा नगर २, नारळी बाग २, शिवशंकर कॉलनी २, हमालवाडी १, न्यु वस्ती जुनाबाजार १, भवानी नगर, जुना मोंढा ५, मनजीत नगर, आकाशवाणी परिसर १, शिवाजी नगर १, उस्मानपुरा ४, रेहमानिया कॉलनी १, रोशन गेट परिसर २, नारेगाव परिसर १, न्याय नगर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिलांचा समावेश आहे.