coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:06 IST2020-08-24T18:05:05+5:302020-08-24T18:06:41+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०, ८५६ एवढी झाली आहे.

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या ६३७ झाली आहे.
मृतांमध्ये वाकोद-फुलंब्री येथील २४ वर्षीय पुरुष, बायजीपुरा येथील ७० वर्षीय महिला, पदमपुरा येथील ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
आज १२९ रुग्णांची वाढ
जिल्ह्यात सोमवारी सकाळी १२९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०, ८५६ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५, ७१२ रूग्ण बरे झाले आहेत. तर ६३७ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४५०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.