coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ३९९ कोरोनाबाधितांची भर, ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:43 PM2020-07-19T23:43:58+5:302020-07-19T23:45:50+5:30

६१४१ कोरोनामुक्त, ४२६६ रुग्णांवर उपचार सुरु

coronavirus: 399 coronavirus cases in Aurangabad district, 4 deaths | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ३९९ कोरोनाबाधितांची भर, ४ मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ३९९ कोरोनाबाधितांची भर, ४ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देएकुण बाधित १० हजार ८०३ रुग्णसंख्या३९६ बाधितांचे मृत्यू

औरंगाबाद ः जिल्ह्यात दिवसभरात ३९९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात शहरातील ३६० तर ग्रामीण भागातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या १० हजार ८०३ झाली असुन आतापर्यंत उपचारादरम्यान ३९६ रुग्णांचा मृत्यु झाल्याने ४२६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळण्याचा उच्चांकाची रविवारी नोंद झाली. जिल्ह्यात विविध रुग्णालयातून उपचार पुर्ण झाल्याने १५५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात मनपा क्षेत्रातील ११५ तर ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ६१४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर अॅण्टीजेन टेस्टद्वारे १३७ रुग्ण पाॅझीटीव्ह असल्याचे आढळून आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.  


चार बाधितांचा मृत्यू
कोरोनाबाधित सादतनगर येथील ३८ वर्षीय पुरुष आणि गजानन कॉलनी, गारखेडा येथील ४२ वर्षीय पुरुष, राधास्वामी कॉलनी, जटवाडा येथील ६५ वर्षीय महिलेचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. तर एका खासगी रुग्णालयात एसटी कॉलनीतील ३० वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
जालान नगर १, अक्षदपुरा १, अल्ताफ कॉलनी, गारखेडा १, आंबेडकर नगर १, एन नऊ सिडको १, खारा कुआँ १, श्रेय नगर १, हेलि बाजार परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर १, एन बारा विवेकानंद नगर १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, नेहरु नगर, कटकट गेट १, सिल्क मिल कॉलनी १, उदय कॉलनी, भोईवाडा १, राम नगर १, हर्ष नगर २, बीड बायपास, सातारा परिसर ३, हनुमान नगर ३, म्हाडा कॉलनी १, राम नगर १, अन्य ६, सादात नगर १, गजानन नगर ५, पीर बाजार, उस्मानपुरा ४, राम नगर १०, विद्युत कॉलनी ९ हडको कॉर्नर १, राज नगर २, बीड बायपास १, सातारा गाव १,  एन पाच सिडको १, कांचनवाडी १, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर १, प्रताप नगर १, पद्मपुरा ३, कोविड केअर सेंटर, किल्ले अर्क ६, छत्रपती नगर २, दशमेश नगर २, क्रांती चौक २, एन दोन सिडको १, नारेगाव १, एन चार हनुमान नगर १, सिडको १, टीव्ही सेंटर ३, चिकलठाणा १, गजानन नगर १, बीड बायपास २, ख्रिस्त नगर ३, छावणी परिसर २, कांचनवाडी १, विटखेडा १, मुकुंदवाडी १, रेल्वे स्टेशन परिसर १, ज्ञानेश्वर नगर, उल्कानगरी १, एमआयडीसी चिकलठाणा १, हमीद कॉलनी, बीड बायपास १, एन सहा सिडको २, आरेफ कॉलनी १, गुरू नगर २, एम दोन, सिडको ३

ग्रामीण भागातील रुग्ण
पोखरी १, एमआयडीसी परिसर, बजाज नगर १, सरस्वती सो.,बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, वडगाव को.१, बजाज नगर १, डोंगरगाव कावड १, बाभुळगाव २, आळंद, फुलंब्री २, शिक्षक कॉलनी, गोंदेगाव १, इंन्ड्युरंस कंपनी परिसर २, बोरगाव, गंगापूर १, विटावा, गंगापूर १, संत नगर, सिल्लोड १, जामा मस्जिद परिसर, सिल्लोड १, केळगाव, सिल्लोड १, टिळक नगर, सिल्लोड १, वैजापूर २, वैजापूर ३, कसाबखेडा, खुलताबाद १, देवगिरी सो., बजाज नगर १, हनुमान नगर, रांजणगाव १, सावता नगर, रांजणगाव १, रांजणगाव ग्रामपंचायत परिसर १, चित्तेगाव १,  कन्नड ४, टिकाराम तांडा, कन्नड १, तेलवाडी, कन्नड २, मोहर्डा तांडा, कन्नड २, पियूषविहार आनंदजनसागर, बजाज नगर २, साई रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर १, रांजणगाव १, राजापूर, पैठण १, पवन नगर, रांजणगाव १, फुलंब्री ४

शहर प्रवेशावेळी आढळलेले रुग्ण
मिटमिटा ५, सातारा परिसर १, विटखेडा ५, चित्तेगाव २, बीड बायपास १, नक्षत्रवाडी २, गादिया विहार १, रांजणगाव ३, सिडको महानगर २, वडगाव १, छावणी २, बजाज नगर २, क्रांती नगर १, पंढरपूर १, बालाजी नगर १, लिंगदरी १, पाचोड १, हर्सुल १ , अन्य १, शेंद्रा ४, वाळूज २, बजाज नगर २, शिवाजी नगर ३, पडेगाव २, मिसारवाडी १

मोबाईल स्वॅब कलेक्शन पथक
नाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा २५, रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा १, एन तेरा १, एन अकरा ७, रेल्वे स्टेशन परिसर २, भीम नगर १, पद्मपुरा २, संभाजी कॉलनी १४, जाधववाडी ५, पुंडलिक नगर ५, राम नगर १४, राजा बाजार ३, कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर १, रेणुका नगर, शिवाजी नगर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: coronavirus: 399 coronavirus cases in Aurangabad district, 4 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.