coronavirus : औरंगाबादेत ५ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३७८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:28 PM2020-05-07T17:28:00+5:302020-05-07T17:28:41+5:30
पुंडलीकनगर येथील रुग्णसंख्येत मोठी वाढ
औरंगाबाद : औरंगाबादेत गुरुवारी सायंकाळी आणखी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ३७८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
जयभीमनगर येथे एकाचा आणि पुंडलीकनगर येथे आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिवभरात पुंडलीकनगर येथील ९ नागरिकांना कॊरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. सकाळी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात जयभीमनगर येथे २ , किलेअर्क येथे २, हक टॉवर रेलवेस्टशन रोड येथे ५ , पुंडलीकनगर येथे ५ आणि कटकट गेट येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.
पुंडलीकनगर येथील रुग्णसंख्येत वाढ
पुंडलीकनगर येथील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ४ मे रोजी येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ६ मे रोजी आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गुरुवारी आणखी ९ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या १४ झाली आहे.
सात दिवसांत ५ मृत्यू
शहरात मागील सात दिवसांत कोरोनाने ५ जणांचा बळी गेला. शहरात १ मे रोजी गुरुदत्तनगर येथील ४७ वर्षीय व्यक्ती, २ मे रोजी नूर कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला, ३ मे रोजी देवळाई परिसरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला. ५ एप्रिल रोजी भडकलगेट- टाऊन हॉल येथील ५८ वार्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ७ एप्रिल रोजी आसेफिया कॉलनीतील वृद्धेचा मृत्यू.