CoronaVirus : औरंगाबादमध्ये दिवसभरात ५० पॉझिटिव्ह; तीन दिवसात तब्बल १८० रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:25 PM2020-05-10T20:25:40+5:302020-05-10T20:27:55+5:30
रविवारी सकाळी ३७ तर संध्याकाळपर्यंत आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली
औरंगाबाद ः शहरात सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडली. दिवसभरातील आकडा ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली आहे. मागील तीन दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी संध्याकाळपर्यंत ५० अशा १८० रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रविवारी आढळून आलेल्या ५० नव्या रुग्णांत अभय पुत्र कॉलनी समता नगर येथील १, न्यायनगर गल्ली नंबर ७ येथील ५, असिफीया काॅलनी येथील १, उस्मानपुरा १ तर बेगमपुरा येथील पाच जणांचा समावेश असल्याची माहीती डाॅ. प्रदिप कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान, सकाळी शहरातील दत्त नगर 1, चंपा चौक 5, राम नगर 15, रामनगर 4, रोहिदास नगर 2 संजय नगर 1, सिल्कमिल कॉलनी 8, वसुंधरा कॉलनी एन 7 सिडको, एमआयटी कॉलेज बीड बायपास येथील प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह आला. यामुळे रुग्णसंख्या 37 ने वाढून एकूण रुग्णसंख्य 545 वर गेली. त्यानंतर दुपारी आणखी 13 पॉझिटिव्ह आढळून आल्याने दिवसभरात एकूण 50 पॉझिटिव्हची भर पडली. यामुळे रुग्णसंख्या 558 वर गेली आहे.