CoronaVirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या ५४५ वर; आणखी ३७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:40 AM2020-05-10T08:40:58+5:302020-05-10T08:41:02+5:30
मागील तीन दिवसात 167 रुग्णांची भर
रविवारी सकाळी शहरातील दत्त नगर 1, चंपा चौक 5, राम नगर 15 या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. तसेच रामनगर4, रोहिदास नगर 2 संजय नगर 1, सिल्कमिल कॉलनी 8, वसुंधरा कॉलनी एन 7 सिडको, एमआयटी कॉलेज बीड बायपास येथील प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले. यामुळे रुग्णसंख्या 37 ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्य 545 वर गेली आहे.
दरम्यान, शहरात शुक्रवारी दिवसभरात १०० रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी १७, दुपारच्या सत्रात १३ अशा दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून बाधित रुग्णांची संख्या ५०८ वर गेली. शनिवारी सकाळी संयजनगर- मुकुंदवाडी ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील काॅलनी व रामनगर येथील प्रत्येकी एक अशी १७ रुग्ण आढळून आली. यात १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांचा समावेश आहे. दुपारी आढळलेल्या तिघांत सातारा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, पंचकुवा किलेअर्क येथील ३५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे. तर त्यानंतर आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये गंगापूरमधील १ आणि पुंडलिक नगर येथील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे शनिवारी दिवसभरात एकूण ३० रुग्णांची भर पडून एकूण रुग्ण संख्या ५०८ वर गेली. वाढलेली रुग्णसंख्या आणि नवीन भागात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.