CoronaVirus : पनवेलवरून ५५ मजूर परतली सोयगावात; सर्वांना केले क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 02:12 PM2020-04-01T14:12:31+5:302020-04-01T14:13:19+5:30
ग्रामस्थांनी सतर्क राहून सर्वांना नेले आरोग्य केंद्रात
सोयगाव : पनवेल येथे वीटभट्टीवर कामासाठी गेलेल्या तालुक्यातील कवली येथील ५५ मजूर बुधवारी पहाटे सात वाजता घरी परतली. मात्र त्यांना गावात प्रवेश देण्याआधी थेट तपासणीसाठी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तपासणी करून १४ दिवस होम क्वॉरंटाईनचा सल्ला देवून त्यांच्यावर शिक्के मारण्यात आले आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी कवली येथील ५५ मजुरांचा जथ्था पनवेल येथे वीटभट्टीच्या कामांसाठी गेलेला होता. लॉकडाऊन असल्याने हे सर्व मजूर गावाकडे परतत होते. दरम्यान, पनवेल भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने येथील ग्रामस्थ सतर्क झाले. बुधवारी पहाटे मजूर गावाकडे पोहचताच पोलीस पाटील निवृत्ती केंडे, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावात प्रवेश करण्याआधी त्यांना आरोग्य तपासणीसाठी जरंडी आरोग्य केंद्रात नेले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार,हर्शल विसपुते आदींच्या पथकांनी या ५५ मजुरांची तब्बल पाच तास तपासणी केली. सर्वांना होमकोरॉटाईन