coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:50 PM2020-07-27T16:50:23+5:302020-07-27T16:52:48+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तर बीड येथील एका कोरोनाबाधिताचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४४९ झाली आहे.
कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा जिल्ह्यात वाढत जात असून आज दुपारपर्यत सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृतू झाला. मृतांमध्ये सिल्क मिल कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुष, खामखेड, बीड येथील ६५ वर्षीय पुरुष, जटवाडा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, पुंडलीकनगर ५४ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा ४२ वर्षीय, भवानीनगर येथील ७० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष या बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ६७ रुग्णांची वाढ
जिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल सोमवारी (दि २७) सकाळी पॉझिटिव्ह आले. महापालिका हद्दीत २४ तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण आढळून आली. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण
गारखेडा १, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पडेगाव ३, रामनगर १, एसटी कॉलनी २, पंचशीलनगर २, नारेगाव २, किर्ती सो. (एन-८) १, ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा १, मुकुंदवाडी ६, जय भवानीनगर २, एन-२, सिडको १
ग्रामीण भागातील रुग्ण
संतपूर, कन्नड १, पाचोड १, बजाजनगर १, औरंगाबाद ३, गंगापूर ९, सिल्लोड ६, वैजापूर २१, पैठण १.
४ हजार १२० बाधितांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४४९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार १२० जणांवर उपचार सुरु आहेत.