coronavirus : औरंगाबादेत ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृत्यू तीनशेच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:13 PM2020-07-04T15:13:18+5:302020-07-04T15:16:58+5:30
आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी अवघ्या साडेपाच तासांत तब्बल ६, तर शनिवारी सकाळी एका बाधिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात पोहचला आहे. जून महिन्यापासून वाढत असलेल्या बाधीतांच्या मृत्यूच्या संख्येत अद्यापही घट झालेली नाही. मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात येऊन पोहोचला असून प्रशासनानेही दुखणे अंगावर काढू नका वेळीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
घाटी रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री १०.३० या साडे पाच तासांत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नारळीबाग येथील ७८ वर्षीय महिला, शाही नगर गारखेडा येथील ६५ वर्षीय महिला, फुले नगर उस्मानपुरा येथील ५२ वर्षीय महिला, दलालवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७८ वर्षीय महिला, आलंगिर कॉलनी येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शनिवारी सकाळी बजाजनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा सकाळी ८.५० वाजता मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे आतापर्यत झालेल्या एकूण मृत्यूचा आकडा २९६ झाला आहे. यात घाटी रुग्णालयात २२६, विविध खाजगी रुग्णालयात ६८ तर जिल्हा रुग्णालयात २ मृत्यू झाले आहेत.
#coronavirus#Aurangabad एकूण रुग्णसंख्या ६४६० वर https://t.co/gyMxCQ0Urw
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 4, 2020
शनिवारी दुपारपर्यंत १९६ बाधितांची भर
शनिवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ११० पुरूष तर ८६ महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३०३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.