coronavirus : कोरोनाबाधित ७ रुग्णांचा मृत्यू; औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६१३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:32 PM2020-08-20T17:32:46+5:302020-08-20T17:34:03+5:30

जिल्ह्यात आज १२० बाधितांची वाढ 

coronavirus: 7 coronavirus patients die; 613 deaths so far in Aurangabad district | coronavirus : कोरोनाबाधित ७ रुग्णांचा मृत्यू; औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६१३ बळी

coronavirus : कोरोनाबाधित ७ रुग्णांचा मृत्यू; औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६१३ बळी

googlenewsNext
ठळक मुद्दे एकूण रुग्णसंख्या १९, ५२७ एवढी झाली आहे. . सध्या ४२२५ जणांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ५, बीड येथील एक आणि जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६१३ झाली आहे.

कादरीनगर-वैजापूर येथील ८० वर्षीय महिला , मुकुंदवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष , लासुर स्टेशन-गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, शहागंज येथील ५२ वर्षीय महिला, आंबडेकनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, मंठा-जालना येथील २५ वर्षीय महिला आणि जालना रोड-बीड येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज १२० बाधितांची वाढ 
जिल्ह्यात गुरुवारी १२० बाधितांची वाढ झाली, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या १९, ५२७ एवढी झाली आहे. आतापर्यंत १४, ६८९ रुग्ण बरे झाले तर ६१३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४२२५ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: coronavirus: 7 coronavirus patients die; 613 deaths so far in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.