Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:28 AM2020-07-29T10:28:25+5:302020-07-29T10:31:18+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत.

Coronavirus: 71 patients increased in Aurangabad district, four die | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत एकूण ४६२ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७१ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९, ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४६२ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 


ग्रामीण भागातील रूग्ण
पाचोड,पैठण २, नूतन कॉलनी, गंगापूर १, औरंगाबाद ९, फुलंब्री १, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण ७, सोयगाव ४

मनपा हद्दीतील रूग्ण
बैजिलालनगर १, सिडको परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, पंचशीलनगर २, रोशन सो., गारखेडा १, उल्कानगरी ४, एन सहा सिडको ६, संघर्षनगर, मुकुंदवाडी ३, सिद्धार्थ नगर ५, गवळीपुरा १, रामनगर १, एन सात, अयोध्यानगर १, गारखेडा परिसर २

चार कोरोनबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समतानगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Coronavirus: 71 patients increased in Aurangabad district, four die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.