coronavirus : औरगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ७३४ मृत्यू; रुग्णसंख्या २५ हजाराच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:19 PM2020-09-05T15:19:00+5:302020-09-05T15:23:00+5:30
जिल्ह्यात सध्या ५,०२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
औरंगाबाद : औरंगाबादेत उपचार सुरू असताना तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनामृत्यूंची संख्या ७३४ झाली आहे.
टीव्ही सेंटर, हडको येथील ६० वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष आणि शहरातील ६० महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने शनिवारी दिली.
जिल्ह्याची रुग्णसंख्या २५ हजारच्या घरात
आजपर्यंत जिल्ह्यात २४,८८९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १९,१२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ७३४ जणांचा मृत्यू झाला असून, ५,०३० रुग्णांवर उपचार सुरू आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एन्ट्री पॉइंटवर ८२, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १३५ आणि ग्रामीण भागात ३४ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
शुक्रवारी ४०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर
जिल्ह्यात शुक्रवारी ४०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर जिल्ह्यात सहा आणि परभणी जिल्ह्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १९९ जणांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात मनपा हद्दीतील २६, तर ग्रामीण भागातील १७३ जणांचा समावेश आहे.