coronavirus : औरंगाबादमध्ये शुक्रवारी ९१ कोरोना रुग्णांची भर, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:16 PM2020-12-19T12:16:22+5:302020-12-19T12:17:55+5:30

coronavirus in Aurangabad जिल्ह्यात आतापर्यंत ४३,०४५ कोरोनामुक्त 

coronavirus: 91 corona patients increased in Aurangabad on Friday, 3 deaths | coronavirus : औरंगाबादमध्ये शुक्रवारी ९१ कोरोना रुग्णांची भर, ३ मृत्यू

coronavirus : औरंगाबादमध्ये शुक्रवारी ९१ कोरोना रुग्णांची भर, ३ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ५६३ रुग्णांवर उपचार सुरूएकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४,७८९

औरंगाबाद : जिल्ह्यात ९१ कोरोनाबाधितांची भर पडली. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ५८ जणांना विविध रुग्णालयांतून उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. त्यामुळे शहरातील ४६ तर ग्रामीण भागातील १२ जण घरी परतले.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४,७८९ एवढी झाली आहे. तर ४३ हजार ४५ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ११८१ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

३ बाधित वृद्धांचा मृत्यू
घाटीत कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ७५ वर्षीय पुरुष, नादरपूर येथील ८० वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात ६६ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीत ८१ रुग्ण
न्यायमूर्तीनगर १, उत्तरनगरी चिकलठाणा १, आचल अपार्टमेंट १, उस्मानपुरा २, ठाकरे नगर सिडको २, पूजा अपार्टमेंट १, भाग्यनगर १, माजी सैनिक कॉलनी, पडेगाव १, टाऊन सेंटर, सिडको एमजीएम हॉस्पिटलजवळ १, एमआयडीसी चिकलठाणा १, हडको १, सुवर्णानगर १, एन ७ सिडको ४, पैठण रोड १, अलोकनगर २, संघर्षनगर मुकुंदवाडी १, त्रिमूर्ती चौक १, गुरुदत्त नगर १, पोलीस स्टेशन एन -७ येथील १, पोलीस कॉलनी १, कासलीवाल तारांगण , पडेगाव १, सिडको एन -३ येथील १, सिंधी कॉलनी १, तुकोबानगर १, एन-२ सिडको १, सेवन हिल परिसर १, पीएफ ऑफिस परिसर २, विष्णूनगर १, एन सात सिडको १, एन नऊ शिवाजीनगर १, श्रेयनगर १, गारखेडा परिसर १, हिमायत बाग १, अन्य ४१ बाधितांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील १० रुग्ण
चितेगाव १, लासूर स्टेशन, गंगापूर २, अन्य ७ बाधित आढळले.

Web Title: coronavirus: 91 corona patients increased in Aurangabad on Friday, 3 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.