CoronaVirus : 'सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे'; पैठण तहसीलदारांच्या आदेशाने अप-डाऊन करणारे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:46 PM2020-04-27T17:46:37+5:302020-04-27T17:48:16+5:30

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे.

CoronaVirus: 'All employees should be headquartered'; Concerned to up-down employees due to Paithan Tahsildar's order | CoronaVirus : 'सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे'; पैठण तहसीलदारांच्या आदेशाने अप-डाऊन करणारे चिंतेत

CoronaVirus : 'सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे'; पैठण तहसीलदारांच्या आदेशाने अप-डाऊन करणारे चिंतेत

googlenewsNext
ठळक मुद्दे६० % कर्मचारी औरंगाबाद येथून अपडाऊन करतातऔरंगाबाद कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने चिंतेत भर

पैठण : औरंगाबाद शहर रेड झोन घोषित झाल्यामुळे औरंगाबाद शहरातून तालुका स्तरावर अप डाऊन करणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या मुख्यालयी राहण्याचे लेखी आदेश तहसीलदार पैठण यांनी आज दिले असून संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व कर्मचारी मुख्यालयी राहतात याची खातरजमा करून तहसीलदार यांना अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे.

पैठण तालुक्याला लागून असलेले औरंगाबाद शहर हे रेड झोन मध्ये दाखल झाले आहे. पैठण शहरातील ६०% शासकीय कर्मचारी औरंगाबाद शहरातून अपडाऊन करत असल्याचे समोर आले आहे. अशा आपत्तीसदृष्य परिस्थितीत विविध उपाययोजना करण्यात येत असून औरंगाबाद शहरात कोविड - १९ विषाणूचा प्रसार जलद गतीने होत असल्यामुळे पैठण तालुक्यात सदर विषाणूचा प्रसार व संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैठण तालुक्यातील परिस्थितीबाबत  तालुका स्तरावरील सर्व शासकीय व निमशासकीय , खाजगी कार्यालयांमधील अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी , ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी, मंडळ अधिकारी,  मंडळ कृषी अधिकारी,  ग्रामविस्तार, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी,  शिक्षक,  तलाठी,  ग्रामसेवक,  कृषी सहाय्यक,  आशा वर्कर, पोलीस पाटील,  कोतवाल  तसेच एमआयडीसी
 पैठण मधील विविध कंपनीतील कामगार,  मेडीकल असोशिएशन वकर्स,  यांनी त्यांच्या मुख्यालयी उपस्थित रहावे असे लेखी पत्र आज विविध शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना तहसीलदार यांनी बजावले आहे.

पैठण तालुक्यातील अधिनस्त सर्व कार्यालयांना हे आदेश लागू असल्याने सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयीन व क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी  कर्मचारी हे मुख्यालयी हजर राहत असल्याची खातरजमा करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर करावा असे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी गैरहजर असल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याचा कार्यालयीन प्रमुखांनी अनुपस्थित असल्याचा अहवाल नियुक्ती प्राधिकरणास देऊन संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ य साथरोग प्रतिबंधक कायदा - १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

६०% कर्मचाऱ्यांचे अपडाऊन;अंमलबजावणी कडे लक्ष.....
पैठण शहरात विविध राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक,  खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कर्मचारी अधिकाऱ्याचे औरंगाबाद शहरातून अपडाऊन सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व बहुतेक कार्यालयाचे प्रमुखच औरंगाबाद शहरातून अपडाऊन करत असल्याने तहसीलदारांच्या आदेशाच्या अंमलबजावणी कडे पैठण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: CoronaVirus: 'All employees should be headquartered'; Concerned to up-down employees due to Paithan Tahsildar's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.