CoronaVirus : 'खाकी'चे कौतुक; पोलीस संचलनादरम्यान खुलताबादकरांनी केली पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 07:48 PM2020-04-08T19:48:18+5:302020-04-08T19:48:57+5:30
खुलताबादेत पोलीसांनी काढलेल्या रूट मार्च (संचलनाच्या) वेळी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून त्याच्याबद्दल कृतद्यता व्यक्त केली.
खुलताबाद : खुलताबाद पोलीसांनी शहरातून काढलेल्या रूट मार्चप्रसंगी बुधवारी एक अनोखे दृष्य दिसले. नागरिकांनी पोलीसांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करत कोरोनाच्या युद्धातील त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या महिनाभरापासून पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेत दिवसरात्र तैनात असून सध्या लॉकडाऊन असल्याने पोलीस सतत गल्लोगल्ली फिरून कधी प्रेमाने तर कधी कायद्याचा धाक दाखवून नागरिकांना घरात बसण्याचे सांगत आहे. विनाकारण फिरना-या लोकांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यामुळेच खुलताबाद शहर तालुक्यात अनूचित प्रकार अथवा काही घटनाघडामोडी घडल्या नाहीत. त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील जनता पोलीस प्रशासनाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर खुश आहेत. आज बुधवारी सायंकाळी खुलताबाद पोलीसांचे रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव , पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी नगरसेवक नवनाथ बारगळ मित्रमंडळातर्फे पोलीसांवर फुलांचा वर्षाव करून पोलीसांच्या कामकाजाबद्दल कौतुक व्यक्त करून त्यांचे स्वागत केले.
येत्या काही दिवसात पोलीसांची आणखी जबाबदारी वाढणार आहे. त्याचबरोबर जनतेची जबाबदारी वाढणार असल्याने कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावेे कुठेही बाहेर फिरू नये. काम असले तरच बाहेर पडा प्रशासन आपल्यासाठीच असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे यांनी केले आहेे.