coronavirus : औरंगाबाद @ १४०१; दिवसभरात ३९ कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 08:10 PM2020-05-28T20:10:24+5:302020-05-28T20:10:28+5:30
अंगुरी बाग, नाथनगर, साई नगर (एन-६), रोकडीया हनुमान कॉलनी या नव्या परिसरात कोरोनाचा नव्याने संसर्ग झाला.
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) सकाळी ३५ तर दुपारी ३ तर सायंकाळी एकास कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १४०१ झाला आहे. तसेच सादातनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील आतापर्यंतचा कोरोनाबळींचा आकडा ६६ झाला आहे.
या भागात आढळले बाधित
बायजीपुरा-१, मिसारवाडी-१, वाळूज महानगर ( बजाजनगर ) १, संजयनगर-१, शहागंज-१, हुसेन कॉलनी-१, कैलासनगर-१, रोकडिया हनुमानकॉलनी-२, उस्मानपुरा-१, इटखेडा-१, एन-४ (सिडको)-४, नारळीबाग-२, हमालवाडी-४, रेल्वे स्टेशन परिसर- २, सिटीचौक-१, नाथनगर-१, बालाजीनगर-१, साईनगर ( एन-६)- १, संभाजी कॉलनी (एन-६ )- २, करीम कॉलनी ( रोशनगेट)-१, अंगुरीबाग-१, तानाजीचौक, बालाजीनगर-१, एन-११ (हडको)-१, जयभवानीनगर-२, रहेमानिया कॉलनी-१, समतानगर- १ व अन्य- १ या भागातील कोरानाबाधित आहेत.
नव्या भागात संक्रमण
अंगुरी बाग, नाथनगर, साई नगर (एन-६), रोकडीया हनुमान कॉलनी या नव्या परिसरात कोरोनाचा नव्याने संसर्ग झाला. तर कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या संजयनगर येथे रुग्ण आढळून आला आल्याने चिंतेत भर पडली आहे.
७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
सादातनगर येथील बाधीत ७२ वर्षीय वृद्धाला २५ मे रोजी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा बुधवारी (दि.२७ ) अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री १०.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 'कोविड न्यूमोनिया विथ मल्टिऑर्गन फेल' असे मृत्यूचे कारण डॉक्टरांनी सांगितले. हा औरंगाबादेतील कोरोनाचा ६६ वा बळी ठरला आहे.