coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या २२६४ वर; आज सर्वाधिक ११४ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:33 AM2020-06-10T09:33:14+5:302020-06-10T09:39:28+5:30
जिल्ह्यात आजवर एकाच दिवसात निदान झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी तब्बल ११४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२६४ झाली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात आजवर एकाच दिवसात निदान झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत कैलास नगर (२), कटकट गेट (१), संसार नगर (१), बारी कॉलनी (२),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (१), औरंगपुरा (१),सिडको एन -७ (२),अरिहंत नगर (१), न्याय नगर, गारखेडा (१), संजय नगर, बायजीपुरा (१), शांतीनिकेतन कॉलनी (१), गजानन नगर, गारखेडा (१), भानुदास नगर (१), गारखेडा परिसर (५), सारंग सोसायटी (२), सहयोग नगर (२),सिटी चौक (१), खोकडपुरा (१), फाहेत नगर, राहत कॉर्नर (३), हर्ष नगर (२), बाबर कॉलनी (१), टिळक नगर (२), शहा बाजार (१), पडेगाव (३), शिवाजी नगर (१), बेगमपुरा (२), बजाज नगर,सिडको (१), जुना बाजार (१), मुलमची बाजार,सिटी चौक (२), मयूर नगर, एन-११ (४), एन-८ (२), आकाशवाणी परिसर (१), मसोबा नगर (१), एन-४,सिडको (१), विशाल नगर (१), आदिनाथ नगर, गारखेडा (२), जाधववाडी (१), टी. व्ही. सेंटर (१), आरटीओ ऑफिस परिसर (१),चित्रेश्वर नगर (१), बीड बायपास (१), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (२), रोकडिया हनुमान परिसर (१), मस्के पेट्रोलपंपाजवळ (१), प्रताप नगर,सिडको (१), एन-६, साई नगर,सिडको (१), बंजारा कॉलनी (१), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (१), ज्योती नगर, दर्गा रोड (१), इंदिरा नगर, बायजीपुरा (१), सावरखेडा, ता. सोयगाव (२), कन्नड (१), सिता नगर, बजाज नगर (५), बजाज नगर परिसर (११), सिडको वाळूज महानगर एक (२), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), गणेश नगर, पंढरपूर (२), अन्य (१६) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ३९ महिला आणि ७५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.