CoronaVirus : औरंगाबाद @ २४४; रुग्णसंख्येत ५ पॉझिटिव्हची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 04:32 PM2020-05-02T16:32:09+5:302020-05-02T16:32:54+5:30

शनिवारी दुपारपर्यंत 28 रुग्णांची भर

CoronaVirus: Aurangabad @ 244; Addition of 5 positives in the number of patients | CoronaVirus : औरंगाबाद @ २४४; रुग्णसंख्येत ५ पॉझिटिव्हची भर

CoronaVirus : औरंगाबाद @ २४४; रुग्णसंख्येत ५ पॉझिटिव्हची भर

googlenewsNext

ir="ltr">औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी ५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता २४४ झाली आहे. यात टाऊन हॉल येथे २, किल्ले अर्क येथे १, संजयनगर येथे १ आणि गौतम बौद्ध नगर येथे १ रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी शहरातील पाच भागात नवे 23 कोरोना बाधित आढळून आले.  त्यात नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, कैलाशनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर येथील 2 बाधीत रुग्णाचा समावेश होता. यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासंख्या 239 वर पोहचली होती. यानंतर दुपारी परत ५ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या २४४ वर गेली आहे. शुक्रवारी दिवसभरात 39 रुग्णाची वाढ झाली त्यामुळे आकडा 216 होता. 244 मधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Web Title: CoronaVirus: Aurangabad @ 244; Addition of 5 positives in the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.