Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात आणखी ८० रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ७०९७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:29 PM2020-07-07T12:29:24+5:302020-07-07T12:34:51+5:30
औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात ७७, तर दुसऱ्या टप्प्यात ८० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा ७ हजार पार गेला आहे. एकूण बधितांची संख्या ७०९७ झाली आहे.
कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून, नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये ८४ पुरूष तर ७३ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७०९७ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत. तर ३२०८ जणांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यत ३१८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज सकाळी ७७ अहवाल त्यानंतर ८० अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत १३९ रुग्ण
घाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतम नगर ३, बुड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकर नगर,एन सात २०, सातारा परिसर ४, विष्णूनगर २, न्यू हनुमाननगर १, विजय नगर ११, विशाल नगर १, गौतम नगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथ नगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १, भोईवाडा २, एन वन दीप नगर १, एन चार सिडको १, एन तेरा हडको १, न्यू हनुमान नगर २, एन सहा, साई नगर १, गजानन नगर १, राम नगर, मुकुंदवाडी १, पवन नगर, हडको १, जय भवानी नगर २, विठ्ठल नगर ३, गजानन कॉलनी ६, एन नऊ सिडको ४, पिसादेवी, गौतम नगर २, अविष्कार कॉलनी १, समता नगर १, सिडको ६, रमा नगर २, पद्मपुरा ८, क्रांती चौक १, जहागीरदार कॉलनी २,मिल कॉर्नर १, नागेश्वर वाडी ४, मातोश्री नगर २, पडेगाव १, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर १, बीड बायपास १, सातारा परिसर १, हर्सुल जेल परिसर १, शिवशंकर कॉलनी ३
ग्रामीण भागात १८ रुग्ण
हतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर ५, भेंडाळा, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ३, इंदिरा नगर, वैजापूर ३ या भागातील कोरोनाबाधित आढळले.