Coronavirus : औरंगाबाद @ ९५८ : कोरोनाचा कन्नड तालुक्यात शिरकाव; रुग्णसंख्येत ५७ ने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:08 AM2020-05-17T09:08:32+5:302020-05-17T09:10:06+5:30
१८ महिन्यांच्या बालकाला कोरोनाची बाधा
औरंगाबाद : शहरात रविवारी सकाळी ५७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५८ झाल्याचे अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी सांगितले.
रविवारी वाढलेल्या रुग्णांत एकूण २२ महिला आणि ३५ पुरुषांचा समावेश असून १८ महिन्यांच्या बालकाचाही यात समावेश आहे. जालान नगर १, उलकानगरी १, रोहिदास हाऊसिंग सोसायटी १, संजय नगर १, सातारा परिसर १, गणपती बाग, सातारा परिसर ६, विद्यानगर, सेव्हन हिल १, एन सहा,सिडको १, पुंडलिक नगर ५, हुसेन कॉलनी ८, राम नगर ३, बहादूरपुरा ८, बारी कॉलनी, गल्ली नं. दोन १, कबाडीपुरा, बुड्डीलेन ३, शरिफ कॉलनी ३, बाबर कॉलनी ३, सिंधी कॉलनी १, न्याय नगर १, न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी १,सिल्क मिल कॉलनी १, घाटी १, रेंटीपुरा १, अन्य १ असे रुग्ण शहरात आढळून आले. तर जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथील ६० वर्षीय महिलेवर घाटीत उपचार सुरू आहेत. त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे
कन्नड तालुक्यात शिरकाव
आतापर्यंत केवळ गंगापूर, औरंगाबाद तालुका परिसरातील ग्रामीण भागातच कोरोना संक्रमण होते. मात्र, रविवारी कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे २ रुग्ण आढळून आले आहेत.