coronavirus : औरंगाबाद तेराशे पार; १६ बाधितांची भर, नव्या भागात शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:52 AM2020-05-25T08:52:02+5:302020-05-25T08:53:07+5:30
एकूण रुग्णसंख्या १३०१ वर
औरंगाबाद : शहरात सोमवारी (दि २५) सकाळच्या सत्रात १६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या १३०१ झाली. आतापर्यंत ५० जणांचा मृत्यु, ६८४ जण घरी परतले ५६७ बाधितांवर उपचार सुरु आहेत.
सोमवारी शहरातील सुभाषचंद्र बोस नगर ( एन ११, हडको)- ४, भवानी नगर- २, रोशन गेट -१ , हुसेन कॉलनी-१, बायजीपुरा- १, इटखेडा (पैठण रोड)- १, अल्तमश कॉलनी- १, जवाहर नगर (गारखेडा परिसर ) -१, शाह बाजार-१, मयूर नगर ( एन-6, सिडको)- १, राम नगर ( एन २ ) - १, गजानन मंदिर परिसर - १ या भागात कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये १० महिला आणि ६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
नव्या भागात शिरकाव
एन ११ मधील सुभाषचंद्र बोस नगर, इटखेडा, गजानन महाराज मंदिर परिसर या भागात नव्याने कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे.