Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १३ हजार १०४ वर ; आज ६६ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:02 AM2020-07-27T09:02:48+5:302020-07-27T09:03:13+5:30
अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६६ रुग्णांचे अहवाल सोमवारी (दि २७) सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १३ हजार १०४ कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ८ हजार ५३६ बरे झाले, ४४३ जणांचा मृत्यू झाला. तर ४ हजार १२५ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण
गारखेडा १, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पडेगाव २, राम नगर १, एसटी कॉलनी २, पंचशील नगर २, नारेगाव २, किर्ती सो., एन आठ १, ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा १, मुकुंदवाडी ६, जय भवानी नगर २, एन दोन सिडको १
ग्रामीण भागातील रुग्ण
संतपूर, कन्नड १, पाचोड १, बजाज नगर १, औरंगाबाद ३, गंगापूर ९, सिल्लोड ६, वैजापूर २१, पैठण १ या भागात रुग्ण आढळले आहे