CoronaVirus In Aurangabad : 'क्रॉस चेकिंग'साठी पुण्याला पाठवलेल्या दोन अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:13 AM2020-04-02T11:13:57+5:302020-04-02T11:19:04+5:30
पुण्याच्या एनआयव्ही मध्ये पाठवले पुन्हा तपासणीसाठी स्वॅब
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयातील ७ आणि घाटीतील २ संशयितांचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह आले. जिल्हा रुग्णालयातील अन्य २ संशयितांचे नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र, तीव्र कोरोना संशयित म्हणून पुणे येथील 'एनआयव्ही'कडून त्यांच्या लाळेचे नमुने पुन्हा एकदा तपासून खात्री केली जाणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात मंगळवारी १३८ लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यात कोरोनासारखी लक्षणे आढळून आलेल्या ९ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातीलन ७ जनांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर अन्य दोन जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले नाही. हे दोन्ही रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. सर्दी, खोकला आदी लक्षणे त्यांच्यात आहेत. तीव्र संशयित म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळासह क्रॉस तपासणीसाठी या दोन जणांचे नमुने पुणे येथील ' एनआयव्ही'ला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ अथवा ३ एप्रिलपर्यत अहवाल येईल. त्यानंतर स्पष्ट होईल, असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.
घाटीत ३० मार्च ते ३१ मार्च या २४ तासांत एकूण ४५ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आली होती. त्यात ६ रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यातील दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. घाटीत ३६ जणांची तपासणी घाटीत २४ तासांत एकूण ३६ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यापैकी ४ रुग्णांचे स्वब घेण्यात आले. आजवर एकूण ३६ रुग्णांचे स्वाब पाठवण्यात आले असून त्यापैकी २७ निगेटिव्ह आले आहेत. आजवर एकही स्वाब पॉझिटिव्ह आलेला नाही. ९ स्वबचा रिपोर्ट यायचा आहे, अशी माहिती घाटी प्रशासनने दिली.
जिल्हा रुग्णालयात १५४ जणांची तपासणी जिल्हा रुग्णालयात १५४ जणांची तपासणी करण्यात आली. यात ४ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. तर ७६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. येथे ६ जण उपचारासाठी दाखल आहेत. ७५ पैकी ४६ व्हेंटिलेटर घाटी रुग्णालयात एकूण ७५ व्हेंटिलेटर आहेत. मात्र, केवळ ४६ व्हेंटिलेटर कार्यान्वित असून त्यापैकी ८ कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहेत.