coronavirus : औरंगाबादेत कोरोना ४ हजारांच्या घरात; १२५ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 09:20 AM2020-06-24T09:20:06+5:302020-06-24T09:22:32+5:30

मनपा हद्दीत ८७ , तर ग्रामीण भागात ३८ रूग्ण वाढले

coronavirus: In Aurangabad, increase of 125 patients today, total patients 3961 | coronavirus : औरंगाबादेत कोरोना ४ हजारांच्या घरात; १२५ रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबादेत कोरोना ४ हजारांच्या घरात; १२५ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण कोरोनाबाधितांची संख्या ३९६१ झाली. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४ हजारांच्या घरात गेली असून, बुधवारी सकाळी १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३९६१ झाली. 

१२५ रुग्णांपैकी ८७ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात ५० महिला आणि ७५ पुरुष असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत कुतुबपुरा १, नागसेननगर १, बंजारा कॉलनी १, सराफा रोड २, व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क १, पडेगाव १, संभाजी कॉलनी, एन सहा १, विद्या रेसिडेन्सी १, जुना बाजार, नारायणनगर १, पुंडलिकनगर २, पद्मपुरा १, इटखेडा १, विष्णूनगर १, सादातनगर १, उल्कानगरी १, संत तुकोबानगर, एन दोन, सिडको १, न्यू हनुमाननगर १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, जयभीमनगर, टाऊन हॉल १, हर्षनगर ७, संजयनगर, बायजीपुरा ४, राजनगर १, हर्सुल जेल ४, सिद्धेश्वरनगर, जाधववाडी २, वसंतनगर, जाधववाडी ३, नागेश्वरवाडी १, एकतानगर, चेतनानगर १, जाधववाडी १, क्रांतीनगर १, म्हसोबानगर १, पोलिस कॉलनी १, एन नऊ हडको १, एन अकरा १, एन तेरा १, राज हाईट १, विनायक नगर, देवळाई २, विशालनगर १, गरम पाणी ३, बुढीलेन ३, गारखेडा ३, हरिचरणनगर, गारखेडा १, शिवाजीनगर १, रोजा बाग २, दिल्ली गेट ६, बेगमपुरा १, नेहरूनगर १, जामा मस्जिद परिसर १०, मयूर पार्क १ कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण
साई नगर, बजाजनगर १, बजाजनगर, वाळूज१, हिवरा २, पळशी १, मांडकी ४, कन्नड १, पांढरी पिंपळगाव १, दर्गा रोड, दारुसलाम पैठण ६, पडेगाव, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ५, गंगापूर २, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, जयसिंगनगर, गंगापूर २, हाफिज नगर, सिल्लोड २, बिलालनगर, सिल्लोड ५, इंदिरानगर, वैजापूर १, पोलिस कॉलनी, वैजापूर १ कोरोनाबाधित आहेत.

Web Title: coronavirus: In Aurangabad, increase of 125 patients today, total patients 3961

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.