Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १९४ कोरोनाबाधितांची वाढ; पाच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:37 PM2020-07-11T19:37:49+5:302020-07-11T19:40:54+5:30

जिल्ह्यात सध्या ३३३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

Coronavirus In Aurangabad: An increase of 194 coronavirus patients in the district; Five deaths | Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १९४ कोरोनाबाधितांची वाढ; पाच मृत्यू

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १९४ कोरोनाबाधितांची वाढ; पाच मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण कोरोना मृत्यू ३४७  एकूण रुग्ण ८ हजार १४३

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोनाच्या आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४७ झाली आहे. यासोबतच शनिवारी सकाळी १५९ रुग्ण आढळून आल्यानंतर दुपारी आणखी ३५ बाधित रुग्णांची भर पडली. यामुळे १९४ कोरोनाबाधित वाढून एकूण रुग्णांचा आकडा ८ हजार १४३ वर गेला आहे. त्यापैकी ४४६३ रूग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३३३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

हडको, एन-११, दिपनगर येथील ८० वर्षीय पुरुष आणि बायजीपुरा येथील ३४ वर्षीय महिला, वाळूज येथील श्रद्धानगर येथील ५० वर्षीय पुरुष, लोटाकारंजा येथील ५० वर्षीय पुरुष आणि क्रांतिचौक येथील ६९ वर्षीय रुग्णासह कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण 
नक्षत्रवाडी २, एन अकरा, सिडको २, हर्सूल कारागृह परिसर १, मुकुंदवाडी १, कांचनवाडी १, अन्य २, रामनगर,चिकलठाणा १, पडेगाव ३, विद्यापीठ गेट परिसर १, उथर सो., हर्सुल २, नवनाथनगर ७, नवजीवन कॉलनी २, रेणुका माता मंदिर परिसर १, राजे संभाजी कॉलनी २, रामनगर ६, छावणी ६, एन अकरा हडको ३, हर्सुल १, बाबर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ८, रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड १, प्रियदर्शनीनगर, गारखेडा १, प्रगती कॉलनी १, एन बारा, हडको १, किराणा चावडी १, कोकणवाडी २, काल्डा कॉर्नर १, ज्योतीनगर १, द्वारकापुरी १, पद्मुपरा १, जयसिंगपुरा १, श्रद्धा कॉलनी १, हनुमाननगर १, शनि मंदिराजवळ, अदालत रोड १, मीरानगर, पडेगाव १, गजानननगर १, विष्णूनगर ९, दौलताबाद टी पॉइंट परिसर ३, एन नऊ सिडको १, एन सहा सिडको ७, हनुमाननगर २, माऊलीनगर, हर्सुल १, हिमायत बाग २, आदर्श कॉलनी, गारखेडा १, रामकृष्ण नगर, गारखेडा १, उल्का नगरी २, जय भवानीनगर १, नारेगाव ३, अरिहंतनगर १, लॉयन्स हॉस्पीटल परिसर २, पुंडलिकनगर ३, बजाज सो., सातारा परिसर १,- ठाकरेनगर, सातारा परिसर १, माऊलीनगर १, शंभूनगर १, एन तेरा, वानखडे नगर, हडको १, गारखेडा २, नागेश्वरवाडी १, जालना रोड १, एन पाच सिडको १, हतनूर वस्ती १, मछली खडक १ निराला बाजार २, जरीपुरा १, कांचनवाडी १ किराणा चावडी १, औरंगपुरा १

ग्रामीण रुग्ण 
पैठण १, वाळूज, गंगापूर ५, अजबनगर, वाळूज १, सहारा सिटी, सिल्लोड ३, अंधारी सिल्लोड १, मारवाड गल्ली, लासूरगाव २, जनकल्याण मार्केट नगर, बजाजनगर १, बसवेश्वर चौक, बजाजनगर ३, आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाजनगर २, सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाजनगर १, आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी २, फुलेनगर, पंढरपूर १, नेहा सो., बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण ७, चिंचाळा, पैठण ३, वरूडकाझी १, सावंगी ४, तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री ४, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १ एनएमसी कॉलनी, वैजापूर २ , गेवराई, पैठण रोड १, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव २, मातोश्री नगर, रांजणगाव ३, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, गणेश वसाहत, वाळूज १, नागापूर, कन्नड २, हतनूर, कन्नड १, बनशेंद्रा, कन्नड १, ओमसाई नगर, कमलापूर, गंगापूर ३, माऊली नगर १, साकेगाव, बोरसर १ सफियाबादवाडी, बोरसर २, दुर्गा नगर, वैजापूर १,  
 

Web Title: Coronavirus In Aurangabad: An increase of 194 coronavirus patients in the district; Five deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.