Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात ३६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १० हजार ८३९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:37 AM2020-07-20T09:37:54+5:302020-07-20T09:38:17+5:30
बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१४१ एवढी आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी सकाळी ३६ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कारोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या १०, ८३९ झाली आहे.
जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१४१ एवढी आहे. तर आजपर्यंत एकूण ३९६ जणांचा मृत्यू झाला असून, आजघडीला ४३०२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद शहरातील रुग्ण
जामा मस्जिद परिसर १, लक्ष्मीनगर २, देवगिरी कॉलनी १, राजीव गांधीनगर १, गुरूदत्तनगर गारखेडा १
ग्रामीण भागातील रुग्ण
बकवालनगर वाळुज १, पाचोड १, साबणे टॉकीज परिसर, गंगापुर ५, लासुर स्टेशन १, शिरसगांव १, मेहबुब खेडा १, रेणुकानगर, अजिंठा १, आंबेडकरनगर, वैजापुर १, गोल्डननगर वैजापुर १, एनएमसी कॉलनी वैजापुर १, वैजापुर ५
चेक पोस्ट वरील रुग्णसंख्या
सुधाकरनगर १, मिटमिटा ३, जाधववाडी २, सिध्दार्थनगर १, हर्सुल १, बालाजीनगर १ बजाजनगर २