औरंगाबाद @ १६४२; कोरोनाबाधीत ५५ रुग्णांची वाढ, एक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:08 AM2020-06-02T09:08:35+5:302020-06-02T09:09:16+5:30
४९९ जणांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (दि. २) सकाळी ५५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६४२ तर आतापर्यंत मृत्यू संख्या ७९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १०६५ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांत शहा बाजार १, किराडपुरा २, चंपा चौक १, कटकट गेट १, नारळीबाग १, गणेश कॉलनी १, जवाहर नगर ३, भीम नगर २, हमालवाडी १, शिवशंकर कॉलनी २, नाथ नगर २, ज्योती नगर १, फजलपुरा परिसर १, मिल कॉर्नर १, एन-३ सिडको १, एमजीएम परिसर १, रोशन गेट १ , विशाल नगर, गारखेडा परिसर १, एन-सहा संभाजी कॉलनी ७, समता नगर ५, अंहिसा नगर १, मुकुंदवाडी १, विद्या निकेतन कॉलनी १, न्याय नगर १, बायजीपुरा २, संजय नगर, मुकुंदवाडी ४, विजय नगर २, यशवंत नगर, पैठण १, चंपा चौक, म्हाडा कॉलनी १, नेहरु नगर १, जुना मोंढा नाका परिसर १, अन्य ३ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २४ महिला आणि ३१पुरुष रुग्णांचा समावेश असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
वृद्धाचा मृत्यू; जिल्ह्यातील बळी ७९
एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा सोमवारी रात्री साडेअकरा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांधील हा आतापर्यंतचा १५ वा मृत्यू तर जिल्ह्यातील ७९ व मृत्यू ठरला आहे.