Coronavirus In Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:08 PM2020-07-25T23:08:18+5:302020-07-25T23:11:04+5:30

जिल्ह्यात सध्या ४ हजार ३१२ रुग्णांवर उपचार सुरू 

Coronavirus In Aurangabad: The number of coronavirus patients in Aurangabad district is on the threshold of 13,000 | Coronavirus In Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर

Coronavirus In Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी २३७ रुग्णांची वाढ : ५ रुग्णांचा मृत्यू एकूण १२ हजार ९०८ कोरोनाबाधित आढळले आहेतआतापर्यंत एकूण ४३७ जणांचा मृत्यू झालेला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी २३७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर गेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९०८ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार १५९ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३७ जणांचा मृत्यू झालेला आहे. आजघडीला ४ हजार ३१२ जणांवर उपचार सुरु आहेत. 

कृष्णानगर येथील ५० वर्षीय पुरुष, संघर्षनगर-मुकुंदवाडी येथील ८८ वर्षीय पुरुष, जालाननगर येथील ७५ वर्षीय पुरुष , चापानेर ( कन्नड) येथील ६० वर्षीय महिला, दहेगाव ( वैजापूर) येथील ५५ वर्षीय पुरुष आणि मालसोंदेव (जालना) येथील २५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने शनिवारी दिली. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४०६ रुग्णांना रुग्णालय, मनपाच्या केंद्रातून सुटी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील २६५, तर ग्रामीण भागातील १४१ रुग्णांचा समावेश आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण :
मुकुंदवाडी १, जालाननगर ४, अंबिकानगर, गल्ली नं. ८, मुकुंदवाडी १, निशांत पार्क परिसर, बीड बायपास १, एमजीएम परिसर २, हर्सुल १, मारोतीनगर, सिडको एन सहा येथील १, बापूनगर, खोकडपुरा १, कोकणवाडी २, जवाहर कॉलनी १, एन आठ सिडको १, नारेगाव २, म्हाडा कॉलनी ३, शिवाजीनगर १, टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी १, मिल कॉर्नर, पोलिस कॉलनी १ , मित्रनगर १, राजीव गांधीनगर २, सातारा परिसर १, गारखेडा १, गजानन कॉलनी १, सिंधी कॉलनी, क्रांती चौक १, एन आठ १, एन बारा १, रघुनाथनगर 1, अन्य ३, गणेश कॉलनी १, जाधववाडी १, गंगापूर १, साई संकुल, नक्षत्रवाडी १, बीड बायपास १, गुलमंडी १, छायानगर, एन नऊ सिडको १, न्यू हनुमाननगर, गारखेडा १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, मनजितनगर १ 

ग्रामीण भागातील रुग्ण: सिडको वाळूज महानगर १, राजीव गांधीनगर, खुलताबाद १, लाडगाव रोड, वैजापूर ८, हिंगोनी, वैजापूर १, घायगाव, वैजापूर १, निवारा नगरी, वैजापूर १, साई नाथ कॉलनी, वैजापूर १ चिंचडगाव, वैजापूर १, मुळे गल्ली, वैजापूर १ बेलगाव, वैजापूर १, दुर्गा नगर, वैजापूर १,सोनार गल्ली, गंगापूर १, बजाजनगर, वाळूज २, देवगावरंगारी २, नवगाव, पैठण १, इंगळे वस्ती, वैजापूर १, अन्य १, रांजणगाव १, महालक्ष्मी खेडा, गंगापूर १, माऊलीनगर, गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, औरंगाबाद १९, फुलंब्री ४, गंगापूर १७, वैजापूर २६, पैठण १० 

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण : होनाजीनगर १, आडूळ २, बाळापूर १, अंबिकानगर १, वैजापूर २, वाळूज महानगर १, कमलापूर १, पोलिस वसाहत २

Web Title: Coronavirus In Aurangabad: The number of coronavirus patients in Aurangabad district is on the threshold of 13,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.