Coronavirus In Aurangabad : बाधितांचा आकडा १२८ ने वाढला; एकूण रुग्णसंख्या ६६४४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 10:12 AM2020-07-05T10:12:04+5:302020-07-05T10:12:34+5:30
आता ३१०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी १२८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ८५ तर ग्रामीण भागातील ४३ रुग्णांचा समावेश आहे.
नव्याने आढळून आल्या १२८ रुग्णांत ६५ पुरूष, ६३ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६६४४ कोरोनाबाधित आढळले असून ३२४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. ३०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ३१०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत ८५ रुग्ण
म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, घाटी परिसर १, हिलाल कॉलनी १, बेगमपुरा १, हर्सुल १, सातारा परिसर २, संजय नगर २, द्वारकापुरी १, पद्मपुरा ४, आकाशवाणी परिसर १, क्रांती चौक १, पन्नालाल नगर १, जय विश्वभारती कॉलनी १, चेलिपुरा १, धूत हॉस्पीटल परिसर १, हनुमान नगर, उल्कानगरी ३, राज नगर ५, शिवाजी नगर ३, शिवशंकर कॉलनी १, नारायण कॉलनी, एन दोन १, चौधरी कॉलनी ४, बेगमपुरा २, हडको एन अकरा ३, सिडको एन नऊ २, सुरेवाडी २, सारा वैभव १, एकता नगर १, अल्पाईन हॉस्पीटल परिसर ३, इमराल्ड सिटी २, गजानन नगर १, रेल्वे स्टेशन परिसर ६, पुंडलिक नगर १, अन्य १, रायगड नगर १, शिवनेरी कॉलनी १, जय भवानी नगर २, एन चार सिडको १, पडेगाव २, न्याय नगर १, टीव्ही सेंटर १, सुभाषचंद्र बोस नगर १, नेहरू नगर ६, एसीपी ट्रॅफिक ऑफिस परिसर १, छावणी १, एन दोन सिडको २, न्यू हनुमान नगर १, जय भवानी नगर १, विशाल नगर, गारखेडा १
ग्रामीण भागात ४३ रुग्ण
सार्थ सिटी, वाळूज १, अजिंठा १, जय भवानी नगर, बजाज नगर १, एमआयडीसी वाळूज १, फुले नगर, बजाज नगर १, सिडको, बजाज नगर १, पंचगंगा सोसायटी, बजाज नगर १, सिडको महानगर १, नीलकमल सो., बजाज नगर १, वडगाव, बजाज नगर २, वाळूज महानगर १, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, गोल्डन सिटी, वडगाव कोल्हाटी ५, जागृती हनुमान मंदिर परिसर २, हॉटेल वृंदावन परिसर, बजाज नगर ४, प्रताप चौक, बजाज नगर १, साजापूर, बजाज नगर १, कृष्णा कोयना सो., बजाज नगर ३, साई नगर, बजाज नगर १, दिग्विजय सो., बजाज नगर १, विश्वविजय सो., बजाज नगर १, चिंचबन सो., बजाज नगर १, शिवराणा चौक बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, तोंडोली, पैठण १, कुंभारवाडा, पैठण १, माळुंजा २, वाळूज गंगापूर १, रांजणगाव १, भेंडाळा, ता. गंगापूर १, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.