Coronavirus In Aurangabad : शहरात २७ ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:05 PM2020-07-18T19:05:05+5:302020-07-18T19:07:04+5:30

२७ वसाहतींमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण जास्त आढळून आल्याने त्या भागात शुक्रवारपासून व्यापक प्रमाणात तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Coronavirus In Aurangabad: Rapid antigen test at 27 places in the city | Coronavirus In Aurangabad : शहरात २७ ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट

Coronavirus In Aurangabad : शहरात २७ ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देसंचारबंदीतील नियोजन शुक्रवारपासून झाली तपासणी सुरू

औरंगाबाद : शनिवारी रात्री बारा वाजता संचारबंदी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. २७ वसाहतींमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण जास्त आढळून आल्याने त्या भागात शुक्रवारपासून व्यापक प्रमाणात तपासणी सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवारी शिवनेरी कॉलनी येथील मारुती मंदिरात मनपातर्फे रॅपिड अँटिजन टेस्टिंंग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी भेट दिली. नागरिकांशी संवादही साधला. तसेच कंटेन्मेंट झोन व औषध फवारणीसह इतर उपाययोजना करण्याबाबत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.  विनाकारण गर्दी झाल्यास आपल्याच आरोग्यास धोका होऊ शकतो म्हणून लॉकडाऊन संपल्यावर नागरिकांनी संयम बाळगावा व अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अँटिजन टेस्टिंंग शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना आवाहन करण्यासाठी प्रशासक शुक्रवारी स्वत: अयोध्यानगर येथे फिरले. अयोध्यानगर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात रॅपिड अँटिजन टेस्टिंंग शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी परिसरात स्वत: फिरून भोंग्याद्वारे नागरिकांना या टेस्टिंंगसाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले. शुक्रवार आणि शनिवारी या ठिकाणी रॅपिड अँटिजन शिबीर सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने शिवनेरी कॉलनी, अयोध्यानगर, बाबर कॉलनी, रेहमानिया कॉलनी, हर्षनगर, बेगमपुरा इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.  

शनिवारी होणार या १६ ठिकाणी तपासणी :
हडको एन-१३ - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. समीर.
हाडको एन-११ - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. रवी सावरे.
भीमनगर - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. सुहासिनी.
आरेफ कॉलनी - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. प्रेरणा बडेरा.
पदमपुरा - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. भांबरे.
हमालवाडा - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. परदेसी.
देवळाई - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. उनवणे.
संभाजी कॉलनी - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. आलिया.
जाधववाडी - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. मापारी.
पुंडलिकनगर - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. सुषमा.
रमानगर - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. पाथरीकर.
राजाबाजार - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. फरहीन.
रेल्वेस्टेशन - सकाळी ११ वाजता.
शंभूनगर - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. कराड.
रेणुकानगर - सकाळी ११ वाजता. पथकप्रमुख डॉ. कावळे.
भवानीनगर - दुपारी ३ वाजता. पथकप्रमुख डॉ. तनवीर. 

Web Title: Coronavirus In Aurangabad: Rapid antigen test at 27 places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.