Coronavirus In Aurangabad : धक्कादायक ! कोरोनाबाधित ४ वर्षीय चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 02:17 PM2020-07-07T14:17:41+5:302020-07-07T14:22:30+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत ३२१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात ३ कोरोनाबधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यात आतापर्यंतच्या सर्वात कमी ४ वर्ष वयाच्या बाधित चिमुकल्याचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आतापर्यंतच्या सर्वात कमी ४ वर्ष वयाच्या शरीफ कॉलनी येथील बाधित चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे तीव्र श्वसन विकारासह सेप्टिक शॉक झाल्याने सोमवारी दुपारी ४.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. तर वाळूज येथील ४७ वर्षीय महिला, ५३ वर्षीय चेतना नगर येथील बाधितांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले.
मंगळवारी जिल्ह्यात १५७ रुग्णांची भर
जिल्ह्यात सकाळी पहिल्या टप्प्यात ७७, तर दुसऱ्या टप्प्यात ८० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ७ हजार पार गेला आहे. एकूण बधितांची संख्या ७०९७ झाली आहे.