Coronavirus In Aurangabad : आणखी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 06:50 PM2020-07-03T18:50:41+5:302020-07-03T18:51:25+5:30

शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

Coronavirus In Aurangabad : Six more coronavirus patients die during treatment in Aurangabad | Coronavirus In Aurangabad : आणखी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

Coronavirus In Aurangabad : आणखी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद :  शहरात उपचारादरम्यान सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य प्रशासनाने कळवले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतचा कोरोना मृत्यूचा आकडा २८५ झाला आहे. तर शुक्रवारी सकाळी २०० बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या ६२४३ झाली आहे. यातील २९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, २९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

बजाजनगर येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी सकाळी ८.४० वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर घाटी रुग्णालयात अरुणोदय कॉलनी येथील ७२ वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी पहाटे ३ वाजता, लोटाकारंजा येथील ४८ वर्षीय महिलेचा गुरुवारी ४.३० वाजता, शेळूद येथील ६५ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी दुपारी ४.४० वाजता, जुनाबाजार अझिम कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा गुरुवारी सायंकाळी ६.४० वाजता तर अजिंठा येथील ६५ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी रात्री ७.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २०० बाधितांची वाढ 
दरम्यान, शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरात १४२ तर ५८ बाधीत ग्रामीण भागात आढळून आले. त्यामध्ये १२५ पुरूष तर ७५ महिला आहेत. 

मनपा हद्दीत १४२ रुग्ण 
घाटी परिसर १, लोटा कारंजा १, हडको १, जय भवानी नगर १, जाधववाडी २, राज नगर, मुकुंवाडी १, एन एक, सिडको १, तारक कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी २, उस्मानपुरा १, कांचनवाडी २, सिडको, एन चार १, जवाहर कॉलनी १, हनुमान नगर १०, विशाल नगर १, शिवाजी नगर ३,  सातारा परिसर ५, गजानन नगर ३, देवळाई रोड १, अलमगीर कॉलनी २, सादात नगर २, बायजीपुरा १, रेहमानिया कॉलनी २, कोहिनूर कॉलनी ४, विठ्ठल नगर ३, पहाडसिंगपुरा २, सिडको एन अकरा ३, हर्सुल २, एकता नगर ४, पडेगाव २, जय भवानी नगर ७, हिंदुस्तान आवास २, भारतमाता नगर १,  रायगड नगर २, नवजीवन कॉलनी १, पवन नगर १, शिवछत्रपती नगर, एन बारा १, सारा परिवर्तन १, जाधववाडी १, एन अकरा २, रघुवीर नगर, जालना रोड १, एन चार सिडको १, हनुमान नगर, गारखेडा ३, मुलची बाजार, सराफा रोड १, गारखेडा परिसर १, भारत नगर १, राम नगर १, बजरंग चौक, एन सहा २, मुकुंदवाडी १, शांती निकेतन कॉलनी १, संभाजी कॉलनी, एन सहा ५, एन दोन, ठाकरे नगर २, लक्ष्मी नगर, गारखेडा ४, जरीपुरा २, भाग्य नगर १, खोकडपुरा ४, चेलिपुरा १, सेव्हन हिल १,  एन नऊ १, न्यू श्रेय नगर १, बजरंग चौक १, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी १, एन आठ, सिडको १, मिलेनियम पार्क १, छावणी १, छत्रपती नगर, सातारा परिसर ७, कोकणवाडी १, हडको, जळगाव रोड १, नारळीबाग २, नाईक नगर, देवळाई १, मिसारवाडी १, चिकलठाणा १, अन्य १

ग्रामीण भागात ५८ रुग्ण 
नागापूर, कन्नड १, कोलगेट कंपनी जवळ, बजाज नगर १, श्वेतशिल्प सो.,बजाज नगर १, सिंहगड सो.,बजाज नगर ३, दिग्व‍िजय सो.,बजाज नगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर १, कृष्ण कोयना सो.,बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, छावा सो., बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर, बजाज नगर १, अनिकेत सो.,बजाज नगर ३, वाळूज महानगर २, शरणापूर ३, बजाज नगर ३, शांती नगर, वडगाव १, क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी २, विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर २, साऊथ सिटी, बजाज नगर ४, सारा सार्थक सो.,बजाज नगर २, जय भवानी नगर, बजाज नगर २, अल्फान्सो शाळेजवळ, बजाज नगर २, साजापूर १, भवानी नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, माऊली नगर, सिडको, बजाज नगर १, चित्तेगाव १, टिळक नगर, कन्नड १, माळुंजा ४, रांजणगाव ४, दर्गाबेस वैजापूर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus In Aurangabad : Six more coronavirus patients die during treatment in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.