CoronaVirus in Aurangabad : औरंगाबादमध्ये पुण्याहून परतलेला आयटी अभियंता आणि एका गृहिणीस कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 06:00 PM2020-04-02T18:00:38+5:302020-04-02T18:06:07+5:30

परदेशातून परतलेली महिला आणि पुण्याच्या आयटी अभियंत्याचा समावेश

CoronaVirus in Aurangabad: Two Corona positive in Aurangabad; one is IT engineer and women came from foreign | CoronaVirus in Aurangabad : औरंगाबादमध्ये पुण्याहून परतलेला आयटी अभियंता आणि एका गृहिणीस कोरोनाची लागण

CoronaVirus in Aurangabad : औरंगाबादमध्ये पुण्याहून परतलेला आयटी अभियंता आणि एका गृहिणीस कोरोनाची लागण

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे येथील एनआयव्ही येथे केले क्रोसचेक अहवालाच्या 'क्रोसचेक'मध्ये झाली पुष्टी

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याचे खळबळ उडाली आहे. बुधवारी या दोघांचेही नमुने तीव्र कोरोना संशयित असल्याने पुणे येथील 'एनआयव्ही' कडे पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पुण्याच्या एनआयव्हीमधून आलेल्या अवहालावरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याला पुष्टी मिळाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात मंगळवारी १३८ लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यात कोरोनासारखी लक्षणे आढळून आलेल्या ९ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातीलन ७ जनांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर अन्य दोन जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले नव्हते. तीव्र कोरोना संशयित म्हणून त्यांच्या लाळेच्या नमुन्याची पुणे येथील ' एनआयव्ही'ला येथे पुन्हा तपासणी करण्यात आली. येथून प्राप्त अहवालावरून त्यांना कोरोना झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

एक महिला आणि एक पुण्याहून आलेला आयटी अभियंता  
लागण झालेला एक रुग्ण पुणे येथे आयटी अभियंता आहे, तो  काही दिवसांपूर्वीच शहरात परतला होता. तर दुसरा रुग्ण एक महिला आहे, तिचा पती नुकताच दिल्ली येथून परतला होता. दरम्यान, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांची परत चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जिल्हा रुग्णालयात 'हाय अलर्ट'
शहरात कोरोना लागण झालेली दोन रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय 'हाय अलर्ट' वर आहे. 
 

Web Title: CoronaVirus in Aurangabad: Two Corona positive in Aurangabad; one is IT engineer and women came from foreign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.