Coronavirus In Aurangabad : चिंताजनक ! जिल्ह्यात विक्रमी ३७९ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:44 PM2020-07-15T22:44:56+5:302020-07-15T22:47:59+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९४४४ कोरोनाबाधित आढळले आहेत.

Coronavirus In Aurangabad: Worrying! Record increase of 379 patients in the district | Coronavirus In Aurangabad : चिंताजनक ! जिल्ह्यात विक्रमी ३७९ रुग्णांची वाढ

Coronavirus In Aurangabad : चिंताजनक ! जिल्ह्यात विक्रमी ३७९ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे६ रुग्णांचा मृत्यूमनपा हद्दीत २९४ग्रामीण भागात ८५ नव्या रुग्णांची भर

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विक्रमी तब्बल ३७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील २९४ आणि ग्रामीण भागातील ८५ रुग्णांचा समावेश आहे. तर उपचार सुरू असताना ६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९४४४ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५४९९ रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३७० जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३५७५ जणांवर उपचार सुरु आहे. चिकलठाणा येथील ४५ वर्षीय पुरुष , हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष,अंगुरीबाग येथील ५३ वर्षीय पुरुष आणि घाटी येथील निवासस्थानातील ७० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने बुधवारी दिली. खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा आणि ६३ वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे जिल्हात मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत काहीसे कमी झाले आहे. परंतु दररोज रुग्णांचा मृत्यू होणे सुरूच आहे. जिल्हात बुधवारी १४४ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील १३२ रूग्ण तर ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण 
सादातनगर १, भवानीनगर १, क्रांती चौक १, राजनगर १, चित्तेगाव १, मिटमिटा १, बेगमपुरा १, केसरसिंगपुरा १, भीमनगर १, एन चार सिडको १, मिल कॉर्नर १, भोईवाडा, मिल कॉर्नर १, स्वामी विवेकानंद नगर ७, एन नऊ सिडको १, जयसिंगपुरा १, अयोध्यानगर १, छावणी १, एकता कॉलनी १ गजानन कॉलनी १, रोजा बाग १, जवाहर नगर १, जुने मुकुंद नगर १, पैठण रोड १, शिवाजीनगर १, श्रेयनगर ,१ ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, भीम नगर १, नंदनवन कॉलनी १, शेंद्रा एमआयडीसी १, उत्तरानगरी १, घाटी परिसर१, एस टी कॉलनी ३, अशोक नगर, हर्सुल १, जाधववाडी १, जय भवानी नगर १, रमा नगर ४, दत्त नगर १, नक्षत्रवाडी ३, नगर नाका ५ मिसारवाडी १३, , चेलिपुरा २, मिलिंद नगर ११ पद्मपुरा १, अन्य ६, एन अकरा, सिडको ८, हर्सुल ३, राजमाता जिजाऊनगर १, शंभूनगर ४, उल्कानगरी १, सातारा परिसर ३, स्वामी विवेकानंदनगर १, चेलिपुरा २, अरुणोदयनगर १, एन नऊ सिडको १, बीड बायपास ६, भवानीनगर १, रामकृष्णनगर १, एन सहा सिडको ३, जय विश्वभारती कॉलनी २, सिद्धी अपार्टमेंट १, सेव्हन हिल कॉलनी ३, सुरेवाडी १, बंबाट नगर १, भानुदास नगर २, अंगुरी बाग १, एन बारा १, जय भवानीनगर १, भारतनगर, गारखेडा १, कैलासनगर १, अन्य १, भीमनगर १०, पदमपुरा ७, भीमपुरा २, सोनार गल्ली १, लक्ष्मीनगर १, नंदनवन कॉलनी १, कोकणवाडी १, क्रांतीनगर १, छावणी १, मिटमिटा २, अविष्कार कॉलनी १, सावरकरनगरी १.

ग्रामीण भागातील रुग्ण
 तेली गल्ली, फुलंब्री ५, लासूर स्टेशन २, जिकठाण १, बोरगाव, सिल्लोड १, देवरंगारी, कन्नड १, मालपाणी रेसिडन्सी १, रेणुका नगर, शिवाजी नगर १, अयोध्या नगर १, बजाजनगर ५, आनंद जनसागर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, बजाजनगर ३, गंगोत्री पार्क १, स्वस्तिकनगर, बजाजनगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी ५, लोकमान्य चौक, बजाजनगर १, ओमसाईनगर, रांजणगाव १,प्रताप चौक, बजाजनगर १, राम मंदिर परिसर,म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, सरस्वती सो., १, राधाकृष्ण सो., १ ,एसटी कॉलनी, बजाज नगर १, साई प्रतिज्ञा, अपार्टमेंट ३, पळसवाडी, खुलताबाद ७, बोरगाववाडी, सिल्लोड २, गणेश कॉलनी, सिल्लोड ३, घाटनांद्रा, सिल्लोड २, म्हसोबा नगर, सिल्लोड १, पळशी, सिल्लोड १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड १, शिक्षक कॉलनी २ टिळक नगर, सिल्लोड १, अविनाश कॉलनी, वाळूज १, मातोश्रीनगर, रांजणगाव २, साठेनगर, वाळूज ४, बोरगाव २, घानेगाव, वाळूज १, पैठण ३, वैजापूर १, सिल्लोड ९ सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण पिसादेवी २, हर्सूल २, बजाजनगर १, तुर्काबाद खराडी ३, असेगाव १, जोगेश्वरी १, उस्मानपुरा १, पाचोरा १, बेगमपुरा १, कासलीवाल मार्व्हल १, गेवराई तांडा २, नक्षत्रवाडी ३, कांचनवाडी ४, जे सेकटर मुकुंदवाडी २.

Web Title: Coronavirus In Aurangabad: Worrying! Record increase of 379 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.