CoronaVirus : चिंतेत भर; औरंगाबादमध्ये आणखी दोघे कोरोना पाॅझिटीव्ह; बाधितांची संख्या ४२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:24 PM2020-04-24T14:24:48+5:302020-04-24T14:29:01+5:30

भिमनगर भावसिंगपुरा येथील 27 वर्षीय तरुण, आसिफिया कॉलनी येथील 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

CoronaVirus: Aurangabadkars worried; Two more corona positive from Bhimnagar, Asifia Colony | CoronaVirus : चिंतेत भर; औरंगाबादमध्ये आणखी दोघे कोरोना पाॅझिटीव्ह; बाधितांची संख्या ४२ वर

CoronaVirus : चिंतेत भर; औरंगाबादमध्ये आणखी दोघे कोरोना पाॅझिटीव्ह; बाधितांची संख्या ४२ वर

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील कोरोना बाधितांची संख्या 42 गुरुवारी रात्री उशीरा सहा जण कोरोना मुक्त झाले

औरंगाबाद ः कोरोना पाॅझीटीव्ह म्हणुन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या संपर्कातील दोघांचा अहवाल कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे. यात भिमनगर भावसिंगपुरा येथील 27 वर्षीय तरुण, आसिफिया कॉलनी येथील 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे औरंगाबादच्या कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहचली आहे.

गुरुवारी रात्री उशीरा सहा जण कोरोना मुक्त झाले. गेल्या 36 तासांपासून एकही कोरोनाचा रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आला नव्हता. मात्र, शुक्रवारी सहा कोरोनामुक्त लोकांना घरी सोडताच दोघांचे अहवाल कोरोना पाॅझीटीव्ह आले आहे. त्यामुळे शहरवासियांच्या चिंतेत भर पडली आहे. संपर्कातील लोक पाॅझीटीव्ह येण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे शहरवासियांसह आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. भिमनगर येथील 76 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या 45 वर्षीय सुनेला लागण झाली. तर आज शुक्रवारी यांच्याच संपर्कातील 27 वर्षीय युवकाला लागण झाल्याची पुष्टी झाली. तर आसिफिया कॉलनी येथील 65 वर्षीय वृद्धे महिलेच्या संपर्कातील 38 वर्षीय व्यक्तिला देखील लागण झाल्याचे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

Web Title: CoronaVirus: Aurangabadkars worried; Two more corona positive from Bhimnagar, Asifia Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.