CoronaVirus : कोरोना खबरदारी ! क्वारंटाईन सेंटरमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह; संपर्कातील चार महिलांचा स्वॅब घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:17 PM2020-05-01T15:17:14+5:302020-05-01T15:18:01+5:30

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात या महिला आल्या असाव्यात असा संशय आहे. हा रिपोर्ट येईपर्यंत कोणीही अफवा पसरऊ नये. असे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे.

CoronaVirus: Corona Care ! Swabbed four women working in the quarantine center at Chikhalthana | CoronaVirus : कोरोना खबरदारी ! क्वारंटाईन सेंटरमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह; संपर्कातील चार महिलांचा स्वॅब घेतला

CoronaVirus : कोरोना खबरदारी ! क्वारंटाईन सेंटरमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह; संपर्कातील चार महिलांचा स्वॅब घेतला

googlenewsNext
ठळक मुद्देक्वारंटाईन सेंटरमध्ये कार्यरत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी

करमाड : चिकलठाणा येथे कॉरंटाईन ठेवण्यात आलेल्या नागरिकांचा स्वयंपाक बनवण्यासाठी करमाड येथुन चार महिला जातात. त्या ठिकाणी केमिस्टपदावर काम करत असलेली 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यामुळे तेथे काम करत असलेल्या करमाड येथील चार महिलांची देखील तपासणी करण्यात येत आहे.

चारही महिलांचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आला आहे. त्यांचा रिपोर्ट आज रात्री शुक्रवारी (1 मे) किंवा उदया शनिवारी (2 मे) रोजी सकाळ पर्यंत येऊ शकतो. या रिपोर्टकडे करमाडसह संपूर्ण औरंगाबाद तालुक्याचे लक्ष लागून आहे. 

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात या महिला आल्या असाव्यात असा संशय आहे. हा रिपोर्ट येईपर्यंत कोणीही अफवा पसरऊ नये. असे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus: Corona Care ! Swabbed four women working in the quarantine center at Chikhalthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.