CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाची सेंच्युरी; दुपारपर्यंत २३ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १०५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 03:31 PM2020-04-28T15:31:24+5:302020-04-28T15:31:55+5:30
सकाळी १० तर दुपारी २३ नागरिक पॉझिटिव्ह
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने मंगळवारी शतक पार केले. सकाळी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोच दुपारी आणखी १० नागरिकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता १०५ झाली आहे.
शहरात मंगळवारी दुपारपर्यंत २३ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा विळखा वाढतच आहे. शहरात सोमवारी एकाच वेळी तब्बल २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येऊन काही तास उलटत नाही, तोच मंगळवारी सकाळी आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता ९५ झाली.
शहरात सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १३ रुग्णांमध्ये १२ रुग्ण हे एकट्या किल्लेअर्क येथील आहेत. तर एक रुग्ण भीमनगर- भावसिंगपुरा येथील आहे. यात १६ वर्षाच्या आतील ६ मुलांचा समावेश आहे. अन्य ७ जण ४४ वर्षाच्या आतील असून, यात ४ महिला आणि ३ पुरुष आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
त्यानंतर दुपारी आणखी १० जणांचा अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहरात सलग १० व्या दिवशी मंगळवारी सकाळीच कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यात संजय नगर- मुकुंदवाडी येथे २ रुग्ण, पैठण गेट येथे ४, सिल्लेखाना येथे एक , किल्लेअर्क येथे एक , भीमनगर- भावसिंगपुरा येथे एक आणि दौलताबाद येथे एक रुग्ण आढळून आला आहे.