CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे तिहेरी शतक; आणखी २४ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @३२१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 08:42 AM2020-05-05T08:42:47+5:302020-05-05T08:43:45+5:30
२७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता.
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढतच आहे. शहरात मंगळवारी सकाळी तब्बल २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे.
औरंगाबादेत सोमवारपर्यंत २९७ रुग्णसंख्या होती. सोमवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळून आले होते. २७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळीच २४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात २१ रुग्ण एकट्या जयभीमनगर येथील आहेत. बुद्धनगर, अजबनगर आणि संजयनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली.
असा वाढला आलेख
शहरात १५ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४९,३९, ४०, २७, १४, २४ अशी दर दिवशी अनुक्रमे वाढ झाली. शहरातील बाधितांची संख्या २७३ वर पोहचली. यातील दहा जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
नव्या हॉटस्पॉटची भर
मुंबई आणि पुण्यानंतर राज्यात औरंगाबादमध्ये रुग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढत आहे.यात नव्या ठिकानांतून शहर ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरात अवघ्या दोनच दिवसांत ७ नव्या भागांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील तब्बल ३६ भागातील हॉटस्पॉटमधील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुलाबवाडी-पदमपुरा, मेहमूदपुरा, भडकलगेट, सिटी चौक, सिडको एन-५ येथील विजयश्री कॉलनी, बुद्धनगर आणि वाळूज महानगर येथील वडगाव कोल्हाटी, पुंडलिक नगर, हुडको ११ या ठिकाणी कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.पूर्वीच्या हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरासह नव्या भागात वसाहतींमध्ये कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाले. नव्या हॉटस्पॉटची भर पडल्याने. दिवसेंदिवस संपूर्ण शहर कोरोनाच्या जबड्यात जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
असे वाढले रुग्ण
२७ एप्रिल २९
२८ एप्रिल २७
२९ एप्रिल २१
३० एप्रिल ४७
१ मे ३९
२ मे ४०
३ मे २७
४ मे १४
५ मे २४
--
३२१ एकुण कोरोना पॉझीटीव्ह
१० मृत्यू
२५ कोरोनामुक्त
०२ पुन्हा बाधित