CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनात वाढ सुरूच, आणखी १३ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:47 AM2020-04-28T08:47:28+5:302020-04-28T08:48:04+5:30
१३ रुग्णांत १२ हे किल्लेअर्क येथील आहेत. तर एक जण भीमनगर- भावसिंगपुरा येथील आहेत.
ठळक मुद्दे१६ वर्षाच्या आतील ६ मुलांचा समावेश
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा धोका वाढतच आहे. सोमवारी तब्बल २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारी सकाळी आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता ९५ झाली.
१३ रुग्णांत १२ हे किल्लेअर्क येथील आहेत. तर एक जण भीमनगर- भावसिंगपुरा येथील आहेत.
शहरात सलग १० व्या दिवशी मंगळवारी सकाळीच कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यात १६ वर्षाच्या आतील ६ मुलांचा समावेश आहे. अन्य ७ जण ४४ वर्षाच्या आतील असून, यात ४ महिला आणि ३ पुरुष आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.