Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा विसावा बळी; ५५ वर्षीय महिलेचा घाटीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 10:13 AM2020-05-14T10:13:01+5:302020-05-14T10:13:40+5:30

गुरुवारी पहाटे ५.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Coronavirus: Coronavirus 20 th death in Aurangabad; 55-year-old dies in Ghati Hospital | Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा विसावा बळी; ५५ वर्षीय महिलेचा घाटीत मृत्यू

Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा विसावा बळी; ५५ वर्षीय महिलेचा घाटीत मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : हुसैन कॉलनी येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा गुरुवारी पहाटे ५.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.


हा शहरातील विसावा बळी ठरला आहे. घाटी रुग्णालयातील हा १७ वा मृत्यू असून दोन मृत्यू खाजगी तर एक जिल्हा रुग्णालयात झाला आहे. तर हुसैन कॉलनी, गारखेडा येथील हा दुसरा मृत्यू आहे. त्यांना कोरोनामुळे दोन्ही बाजूनी न्यूमोनिया आणि मधुमेह, रक्तदाबाचा त्रास  होता असे डॉक्टरांनी सांगितले


दरम्यान, शहरात गुरुवारी सकाळी 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टास्क फोर्सच्या अध्यक्ष डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामूळे शहराचा एकूण आकडा 742 झाला आहे. भीमनगर भावसिंगपुरा 15, शिवपुरी पडेगाव 1, उस्मानपुरा 7, सिल्कमिल कॉलनी1, कांचनवाडी1 , नारळीबाग 1, आरटीओ ऑफिस परिसर 2, गरमपाणी 1, बन्सीलाल नगर1,  सातारा परिसर 2, सातारा ग्रामपंचायत परिसर 5, सातारा खंडोबा मंदिर परिसर 1, हुसेन कॉलनी गारखेडा 2, संजयनगर 3, न्यायनगर 2, दत्तनगर गल्ली नंबर पाच 1, पुंडलिकनगर 1, गुरू नगर न्यू नंदनवन कॉलनी, गारखेडा 1, शहानुरवाडी 1, किलेअर्क 1, बेगमपुरा 1, रहेमानिया कॉलनी 1,(आन्वा मारुतीमंदिर भोकरदन)घाटीत उपचार 1, सिल्लेखाना 1, नाशन दर्गा परिसर शहाबाजार 1 या भागांतील बाधीत रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus: Coronavirus 20 th death in Aurangabad; 55-year-old dies in Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.